आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने युवा सलामीवीर ईशान किशन निराश झाला आहे. ईशानने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत नाराजी व्यक्त केली होती. ईशान यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि त्याने बहुतेक वेळी चांगली कामगिरी करून संघात आपले स्थान निर्माण केले होते. मात्र, आगामी आशिया चषक आणि टी२० विश्वचषकापूर्वीच्या मालिकांत ईशानला फारशी संधी मिळाली नाही. याच कारणाने त्याची २७ ऑक्टोबरपासून यूएईमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघात निवड झाली नाही. त्यामुळे, ईशानसाठी विश्वचषक स्पर्धेचे दरवाजेही जवळपास बंद झाले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर त्यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.
भारतीय संघातून अचानक बाहेर गेलेल्या ईशानने एका कार्यक्रमात बोलताना म्हटले,
“क्रिकेट माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्याशिवाय मी कशाचाही विचार करत नाही. लहानपणापासून क्रिकेट खेळणे हे माझे स्वप्न होते. मी नेहमीच क्रिकेटच्या महान खेळाडूंकडून आणि आपल्या मेहनतीतून शिकत असतो. संघात स्थान मिळवणे किंवा निवड होणे हे खेळाडूवर अवलंबून नाही. कदाचित माझ्या खेळात काही कमतरता असेल. मी सतत स्वतःमध्ये सुधारणा करत आहे. क्रिकेटमध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे. मी सतत शिकत राहण्यावर विश्वास ठेवतो.”
ईशानने मागील वर्षी भारतीय संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून तो सातत्याने संघाचा भाग होता. मात्र, आयपीएलनंतर तो आपल्या कामगिरीत सातत्य ठेवू शकला नाही. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याला पुरेशी संधी मिळाली नव्हती. मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेता न आल्याने तसेच केएल राहुलने संघात पुनरागमन केल्याने त्याचे संघातील स्थान गेल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला आयसीसी स्पर्धांमध्ये खेळायला आवडते!’ स्वत: शिखर धवनने प्रकट केली इच्छा
अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या पहिल्या मौसमातून अनुभवायला मिळणार अस्सल ‘देशी खो खो’चे नव्या रूपात दर्शन
‘एका हंगामात ४०० धावा करूनही संधी मिळत नसेल तर…’, संघनिवडीवरून नितीश राणा निराश