भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याने काही दिवसांपूर्वीच दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. पूर्व विभागाच्या संघात त्याची निवड करण्यात आली होती. त्याच्या या निर्णयावर अनेकांनी टीका देखील केलेली. मात्र, आता त्याने या निर्णयामागील कारणांचा खुलासा केला आहे. भविष्यकाळात भारतीय संघासाठी अधिकाधिक खेळता येण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
दुलीप ट्रॉफीसाठी संघ निवड करताना किशन याला विचारणा झाली तेव्हा त्याने या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्याने याबाबत बोलताना म्हटले,
“मागील काही काळापासून मी सातत्याने खेळत आहे. दोन महिने आयपीएलमध्ये खेळल्यानंतर इंग्लंडमध्ये देखील काही काळ मी घालवला. त्यामुळे ज्या काळात दुलीप ट्रॉफी होणार आहे, त्यावेळी मी बंगलोर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वेळ घालवेल. तिथे माझ्या खेळात सुधारणा करून आगामी वेस्ट इंडीज मालिकेसाठी तयारी करेल.”
भारतीय संघ 12 जूलैपासून वेस्ट इंडिजविरूद्ध तीनही प्रकारच्या मालिका खेळेल. ईशान भारताच्या वनडे व टी20 संघाचा नियमित सदस्य असला तरी, त्याला अद्याप कसोटी पदार्पण करता आले नाही. वेस्ट इंडीज दौऱ्यावर त्याला ही संधी मिळू शकते. केएस भरत या मालिकेत अपयशी ठरल्यास ईशान भारतीय संघाचा मुख्य यष्टीरक्षक बनेल.
ईस्ट झोन संघ
अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), शांतनू मिश्रा, सुदीप घरामी, रियान पराग, ए मजूमदार, बिपिन सौरभ, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), के कुशाग्र (यष्टीरक्षक), एस नदीम (उपर्णधार), शाहबाज अहमद, मुकेश कुमार, आकाश दीप, अनुकुल रॉय, एम मुरा सिंह, ईशान पोरेल.
(Ishan Kishan Skip Duleep Trophy For Preparation Of West Indies Tour In NCA)
महत्वाच्या बातम्या-
WTC ट्रॉफी गमावल्यानंतर लंडनमध्ये पत्नी अनुष्कासह भजन ऐकायला गेला विराट, फोटोही जोरदार व्हायरल
संतापलेल्या आफ्रिदीचा पीसीबीला घरचा आहेर; अहमदाबाद खेळपट्टीविषयी म्हणाला, ‘तिथं काय आगीचा पाऊस पडतोय?’