---Advertisement---

पंतसारखा किशनही लेफ्टी अन् आक्रमक, पण भरतकडे कसोटीचा अनुभव; WTC फायलनसाठी प्लेइंग 11चा दावेदार कोण?

KS-Bharat-And-Ishan-Kishan
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्याला हाताच्या बोटांवर मोजण्याइतके दिवस उरले आहेत. हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांमध्ये पार पडणार आहे. हा सामना येत्या 7 ते 11 जूनदरम्यान पार पडणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी प्लेइंग इलेव्हनबाबत भारतीय संघापुढे मोठी चिंता आहे. भारतीय संघाचा फलंदाजी आणि गोलंदाजी क्रम सज्ज आहे, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये यष्टीरक्षक म्हणून कोणाला संधी द्यायची, हा प्रश्न अजूनही कायम आहे. कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे ईशान किशन आणि केएस भरत यांच्या रूपात दोन तगडे पर्याय आहेत.

केएस भरतकडे सामन्यातील सरावाचा अभाव
केएस भरत (KS Bharat) हा आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा भाग होता. यादरम्यान त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तो फक्त एका सामन्यात वृद्धिमान साहा दुखापतग्रस्त झाल्यामुळे सब्स्टिट्यूट म्हणून क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरला होता. मात्र, त्याला फलंदाजी करण्याची एकही संधी मिळाली नाही. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध याच वर्षी पदार्पण केले होते. यादरम्यानही त्याला बॅटमधून खास कामगिरी करता आली नव्हती. मात्र, त्याने आपल्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

ईशानकडे कसोटी अनुभवाची कमतरता
भारतीय संघाकडे यष्टीरक्षकाच्या रूपात दुसरा पर्याय ईशान किशन (Ishan Kishan) आहे. त्याला दुखापतग्रस्त केएल राहुल याच्या जागी संघात सामील केले होते. ईशानला कसोटीचा अनुभव नाहीये. कारण, त्याला अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाहीये. मात्र, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही भारतीय संघाचा भाग होता. असे असले, तरीही नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2023 हंगामात जवळपास सर्व सामन्यात ईशान मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्याने 15 सामन्यात 30.27च्या सरासरीने आणि 142.76च्या स्ट्राईक रेटने 454 धावा केल्या.

कोणाला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी?
रिषभ पंत मागील वर्षी 30 डिसेंबर रोजी भीषण रस्ते अपघातात दुखापतग्रस्त झाला होता, तेव्हापासून भारताच्या कसोटी संघातील यष्टीरक्षकाची जागा रिकामी होती. सामन्यांच्या सरावावरून पाहिलं तर, ईशानची संघात जागा बनते. यासोबतच तो डावखुरा फलंदाज आहे. संघाच्या वरच्या फळीत एकही डावखुरा फलंदाज नाहीये, त्यामुळे हीदेखील ईशानसाठी चांगली बाब आहे. दुसरीकडे, तो पंतप्रमाणे गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजीही करू शकतो. अशात, जर संघ व्यवस्थापनाने फक्त यष्टीरक्षणालाच प्राथमिकता दिली, तर कदाचित केएस भरत याची निवड पक्की आहे. (cricketer ishan kishan or ks bharat who will be team india wicket keeper in wtc final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफगाणी पठ्ठ्याने शुबमन गिलचा ‘हा’ रेकॉर्ड केला उध्वस्त, वाचा बातमी
ब्रेकिंग! ‘या’ देशात सेक्सला खेळ म्हणून मान्यता, 16 प्रकारात रंगणार स्पर्धा; 45 मिनिटे चालणार सामना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---