---Advertisement---

रांचीचा नवा राजकुमार! घरच्या मैदानावर इशान किशनचा धमाका; वादळी खेळीने मिळवली वाहवा

On: रविवार, ऑक्टोबर 9, 2022 8:32 PM
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना रविवारी (9 ऑक्टोबर) रांचीमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताला विजयासाठी 279 धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ‘लोकल बॉय’ इशान किशनने वादळी फलंदाजी करत भारताला विजयाच्या जवळ नेले. ही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली.

भारतीय कर्णधार शिखर धवन लवकर बाद झाल्यानंतर इशान मैदानावर उतरला. मागील सामन्यात केलेल्या संथ फलंदाजीमुळे त्याच्यावर अनेकांनी टीका केली होती. ती खेळी सर्वांना विसरायला लावत त्याने या सामन्यात अत्यंत समजदारीने फलंदाजी केली. खराब चेंडूंचा समाचार घेताना चौकार षटकार वसूल केले. यादरम्यान त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले.

अर्धशतकांतर आणखी आक्रमक रूप धारण करत त्याने शतकाकडे आगेकूच केली. वेन पार्नेल व एन्रिक नॉर्किए यांच्यावर विशेष हल्ला चढवत त्याने षटकार वसूल केले. घरच्या मैदानावर शतक झळकावण्याची त्याच्याकडे सुवर्णसंधी होती. मात्र, तो ही संधी साधू शकला नाही.‌ फिरकीपटू फॉर्चुनला षटकार ठोकण्याच्या नादात तो झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने 84 चेंडूवर 93 धावांची खेळी केली. यामध्ये 4 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध त्याने 59 धावा बनविलेल्या.

किशनने तिसऱ्या गड्यासाठी श्रेयस अय्यरसोबत 161 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिका विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय जोडीने केलेली ही दुसरी सर्वात भागीदारी आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांच्या नावे आहे. त्यांनी 189 धावांची सर्वोत्तम भागीदारी केली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वॉर्नरची बॅट थांबायचं नाव घेईना! संघ पराभूत होऊनही पठ्ठ्याने केला खास पराक्रम, बाबरलाही पछाडलं
‘आयपीएल खेळू नका!’, कारणे देणाऱ्या खेळाडूंना भारतीय दिग्गजाने झापले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---