---Advertisement---

‘भिडू तू बिनधास्त भीड’; सामन्यापूर्वी इशान किशनला रोहितने दिला होता मोलाचा सल्ला

---Advertisement---

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघात टी२० मालिका चालू आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (१४ मार्च) अहमदाबाद येथे झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ विकेट्सने मात केली असून मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने झुंजार ७३ धावांची खेळी केली. परंतु या सामन्याचे खरे आकर्षण ठरला तो युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन.

पदार्पणवीर इशानने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळताना अर्धशतक झळकावले. सामन्यानंतर त्याने आपल्या अफलातून खेळीमागचे रहस्य सांगितले आहे.

भारतीय संघाचा विस्फोटक सलामीवीर रोहित शर्माने सामन्यापुर्वी दिलेला सल्ला कामी आल्याचे इशानचे म्हणणे आहे. त्याने इशानला आयपीएलप्रमाणे मनमोकळी फटकेबाजी करण्यास सांगतिले. रोहित आणि इशान हे आयपीएलमधील संघ सहकारी आहेत. ते दोघेही आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहेत.

रोहितविषयी बोलताना इशान म्हणाला की, “रोहित भाईने मला सामन्याआधी सांगितले होते की मी सलामीला फलंदाजी करेल. अशावेळी मी मैदानावर उतरल्यानंतर थोडा घाबरून जाईल. परंतु जेव्हा दिवसाखेर तू भारत देशाचा झेंडा पाहशील आणि स्वत:ला राष्ट्रीय संघाच्या जर्सीत बघशील; तेव्हा आपोआप तुझ्या मनात आपल्याला आपले उत्कृष्ट द्याचे आहे, अशा भावना जागृत होतील. त्यामुळे तू आयपीएलप्रमाणे बिनधास्त फलंदाजी कर.”

https://twitter.com/mipaltan/status/1371346501021011969?s=20

अशी राहिली इशान किशनची कामगिरी 
डावखुरा फलंदाज इशानने आयपीएलमधील त्याच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करत भारतीय संघात जागा मिळवली. त्याला शिखर धवनच्या जागी दुसऱ्या टी२० सामन्यात संधी देण्यात आली होती. या सामन्यात सलामीला फलंदाजीला येत इशांतने ३२ चेंडूत ५६ धावा केल्या. दरम्यान त्याने ४ षटकार आणि ५ चौकार मारले.

मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज असलेल्या इशानने आतापर्यंत ५१ आयपीएल सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ७ अर्धशतकांच्या मदतीने १२११ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

हाच तो रस्ता..! बाद झाल्यानंतर कोहलीने ‘असा’ दाखवला स्टोक्सला पव्हेलियनचा मार्ग; पाहा व्हिडिओ

मी आधीच सांगितलं होतं, टीम इंडियापेक्षा MI भारी आहे; इंग्लिश दिग्गजाने पुन्हा काढली खोड

ज्यूनियर इरफान सचिनसोबत सलामीला फलंदाजीस सज्ज! पाहा क्यूट फोटो

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---