---Advertisement---

ईशानने आगरकर अँड कंपनीला दिला स्पष्ट संदेश! निवडकर्त्यांच्या ‘त्या’ निर्णयाचे इरफान पठाणकडून कौतुक

On: रविवार, फेब्रुवारी 1, 2026 9:26 PM
Ishan-Kishan
---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात ईशान किशनने (ishaan kishan) झळकावलेल्या वादळी शतकाने क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. या कामगिरीनंतर माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने (Irphan pathan) भारतीय निवडकर्त्यांचे आणि ईशानचे तोंडभरून कौतुक केले आहे.

शुबमन गिलसारख्या (Shubman gill) मोठ्या खेळाडूला बाहेर बसवून, घरगुती क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्या ईशान किशनला संधी देणे हा धाडसी निर्णय होता. निवडकर्त्यांनी गुणवत्तेला दिलेला हा न्याय आहे. ईशानने अनुभवी फिरकीपटू ईश सोढीच्या एका षटकात 29 धावा ठोकून आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने आपल्या ‘ऑफ-साइड’ खेळावर प्रचंड काम केले आहे, जे त्याच्या फलंदाजीत स्पष्ट दिसतेय.

या 5 सामन्यांच्या मालिकेत संजू सॅमसनला (Sanju Samson) खास कामगिरी करता आली नाही, त्यामुळे आता ईशान किशनने आपले स्थान भक्कम केले आहे. शतक ठोकल्यानंतरही ईशानने ज्या उत्साहात यष्टीरक्षण (Wicketkeeping) केले, त्यावरून त्याची फिटनेस कमालीची असल्याचे दिसते.

तिलक वर्मा (Tilak Verma) दुखापतीतून परतला तरी ईशानला आता बाहेर बसवणे कठीण जाईल. सपाट खेळपट्टीवर ईशानला रोखणे अशक्य आहे, असेही पठाणने नमूद केले. संजू सॅमसनच्या खराब फॉर्ममुळे आणि ईशानच्या जबरदस्त पुनरागमनामुळे टी-20 वर्ल्ड कपसाठी ईशान किशनने आपला दावा अधिक मजबूत केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---