चेम्सफोर्ड | काऊंटी क्रिकेटमध्ये इसेक्स विरुद्ध याॅर्कशायर सामन्यात आज पहिल्या दिवशी याॅर्कशायरचा संपुर्ण डाव ५० धावांत संपुष्टात आला.
विशेष म्हणजे याॅर्कशायरकडून कसोटी क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजारा, इंग्लंडचा कर्णधार जो रुट तसेच जाॅनी ब्रेर्स्टो हे खेळत आहेत.
पुजारा आज ९ धावांवर बाद झाला. काऊंटी क्रिकेटचा २०१८चा हंगाम या खेळाडूसाठी अतिशय खराब ठरला. ३ सामन्यात या खेळाडूला अजूनही विशेष काही करता आले नाही. त्याने गेल्या ३ सामन्यात २, १८, ७, ६ आणि ९ अशा धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ही ८.४ ची आहे.
तर इशांत शर्माने मात्र ३ सामन्यात २२, ६६, नाबाद ७ आणि ६ अशा धावा केल्या आहेत. त्याची सरासरी या सामन्यांत ३३.६६ची आहे.
सारखेच सामने खेळूनही इशांतने पुजारापेक्षा ५९ धावा जास्त केल्या आहेत. इशांत गोलंदाजीतही ३ सामन्यात ८ विकेट्स मिळाल्या आहेत.
In County this season
Pujara
2, 18, 7, 6, 9Ishant
22, 66, 7*, 6— CricBeat (@Cric_beat) May 4, 2018
Cruel Fact: @ImIshant has scored more runs than @cheteshwar1 in the @CountyChamp so far!
Ishant Sharma's scores: 22, 66, 7* & 6
Cheteshwar Pujara's scores: 2, 18, 7 & 6 https://t.co/CttzfMbHKw— Arun Gopalakrishnan (@statanalyst) May 2, 2018
Will County Stint Help Him ? Ashwin has Been Scoring Runs But Pujara Struggles to Make An Impact in County & Ishant Scores a Fifty Too .
— Johns. (@CricCrazyJohns) April 25, 2018