---Advertisement---

उद्या पहिली विकेट घेताच इशांत शर्माला जॅक कॅलिसचा ‘तो’ विक्रम मागे टाकण्याची संधी

On: गुरूवार, फेब्रुवारी 20, 2020 8:05 PM
---Advertisement---

उद्या (21 फेब्रुवारी) बेसिन रिझर्व (Basin Reserve), वेलिंग्टन (Wellington) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (2 Matches of Test Series) पहिला सामना सुरु होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 4 वाजता सुरु होणार आहे.

या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला (Ishant Sharma) दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिसचा (Jacques Kallis) एक विक्रम मोडण्याची संधी आहे.

या सामन्यात इशांतने 1 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कॅलिसला मागे टाकेल.

सध्या इशांतने 96 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 32.68 च्या सरासरीने 292 विकेट्स घेतल्या आहेत. तर कॅलिसने 166 कसोटी सामन्यांमध्ये 32.65 च्या सरासरीने 292 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच सध्या कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत इशांत आणि कॅलिस संयुक्तरित्या 35 व्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर इशांतने जर उद्या हा विक्रम केला तर तो कॅलिसपेक्षा 69 कसोटी सामने कमी खेळलेला असेल.

त्याचबरोबर इशांतने या कसोटी मालिकेत 8 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो भारताकडून कसोटीत 300 विकेट्स पूर्ण करणारा 6 वा गोलंदाजही ठरेल. आत्तापर्यंत भारताकडून अनिल कुंबळे, कपिल देव, हरभजन सिंग, आर अश्विन आणि झहीर खान यांनी 300 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. इशांत सध्या सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत 6 व्या क्रमांकावर आहे.

कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा फिरकीपटू गोलंदाज मुथैय्या मुरलीधरन (800) आहे. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्न (708) आहे. तर भारताचा फिरकीपटू गोलंदाज अनिल कुंबळे (619) हा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय क्रिकेटपटू-

619 विकेट्स – अनिल कुंबळे

434 विकेट्स – कपिल देव

417 विकेट्स – हरभजन सिंग

362 विकेट्स – आर अश्विन

311 विकेट्स – झहीर खान

292 विकेट्स – इशांत शर्मा

266 विकेट्स – बिशन सिंग बेदी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---