इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये इशांत शर्मा चांगले प्रदर्शन करत आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या मागच्या दोन सामन्यांमध्ये इशांतला खेळण्याची संधी मिळाली. हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कार देखील मिळाला. क्रिकेटच्या मैदानात इशांतला पुनरागमनाची संधी मिळाली आणि त्याने ही संधी सांधली देखील. आता इशांतचा एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामध्ये तो नेट्समध्ये घाम गाळताना दिसत आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून इशांत शर्मा (Ishant Sharma) याचा हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओत इशांत शर्मा नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करत आहे. व्हिडिओसोबत खास कॅप्शन देखील दिले गेले आहे. चाहते मागच्या वर्षभरात इशांत शर्माला जास्त खेळताना पाहू शकले नाहीत. अशात हा सराव सत्रातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, आयपीएल 2023 मधील पहिला सामना इशांतला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळता आला. या सामन्यात त्याने 19 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. हंगामातील दुसरा सामना इशांतने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला. या सामन्यात त्याने तीन षटके गोलंदाजी केली आणि 18 धावा खर्च करून एक विकेट घेतली. इशांतने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. अशात आता आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करून इशान भारतीय संघात पुनरागमन करू इच्छित असेल. आयपीएल 2022च्या मेला लिलावात इशांतला खरेदी कऱण्यासाठी एकाही फ्रँचायझीने पुढाकार घेतला नव्हता. मात्र आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याला 50 लाखांच्या बेस प्राईसमध्ये संघात सामील केले.
इशान चालू आयपीएल हंगामात इशांत प्रतिनिधित्व करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे प्रदर्शन मात्र खूपच निराशाजनक राहिले आहे. रिषभ पंत याच्या अनुपस्थितीत डेविड वॉर्नर दिल्लीचा कर्णधार आहे आणि संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. हंगामातील सुरुवातीच्या 7 सामन्यांपैकी फक्त 2 सामने दिल्लाला जिंकता आले आहेत. (Ishant Sharma is sweating it out in the nets and video shared by Delhi Capitals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंड क्रिकेटमध्ये येणार भूकंप? आयपीएल संघांनी राष्ट्रीय संघ सोडण्यासाठी दिली कोट्यावधींची ऑफर? वाचा सविस्तर
मॅचविनर ठरूनही रॉयवर झाली कारवाई! सामन्यादरम्यान केलेली ती चूक भोवली