नवी दिल्ली। कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणारा गोलंदाज इशांत शर्माने अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्याचा समावेश त्या २७ खेळाडूंमध्ये आहे, ज्यांना या वर्षीचा प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार मिळणार आहे. इशांतने भारतीय संघाकडून ९७ कसोटी सामने खेळले आहेत. अर्जुन पुरस्कार २०२० ची घोषणा मागील आठवड्यामध्येच केली होती. यांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू दीप्ती शर्माच्या नावाचाही समावेश आहे.
बीसीसीआयने राष्ट्रीय पुरस्कारांसाठी इशांत, दीप्ती आणि रोहित शर्मा यांच्या नावाची शिफारस केली होती. रोहित सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहलीनंतर ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ जिंकणारा ४था क्रिकेटपटू बनला आहे.
इशांतने म्हटले, माझी पत्नीही आहे या पुरस्कारासाठी दावेदार
बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका व्हिडिओत इंशातने म्हटले की, “माझी पत्नीदेखील या पुरस्कारासाठी माझ्याइतकीच दावेदार आहे. कारण पत्नीने माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला आहे.”
‘माझ्यापेक्षा माझी पत्नी खूप आनंदी’
इशांतने या व्हिडिओत पुढे म्हटले, “मला वाटते की, माझ्यापेक्षा माझी पत्नीच खरं तर आनंदी आहे. कारण ती विचार करते की मला पुरस्कार मिळाला पाहिजे. त्यामुळे मला वाटते की तीसुद्धा या पुरस्काराची दावेदार आहे.”
त्याने १३ वर्षांच्या या प्रवासाबद्दल आपले मत व्यक्त करत म्हटले, इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. “जेव्हा मला समजले की, मला अर्जुन पुरस्कार मिळत आहे, तेव्हा मी खूप खुश झालो होतो. इतकेच नव्हे तर मला स्वत:चा अभिमान आहे. तुम्हाला माहीत आहे की मागील १३ वर्षांपासून मी खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे हे माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
भारतीय वेगवान गोलंदाजी फळीच्या यशाचे गुपित सांगितले
वेगवान गोलंदाज झहीर खानच्या जाण्यानंतर इशांतच भारतीय संघाचा कसोटीतील सर्वात अनुभवी गोलंदाज राहिला आहे. ३१ वर्षाय इशांत मागील १३ वर्षांपासून कसोटी संघाचा मुख्य आधार आहे. मागील काही वर्षांमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजी फळीबाबत त्याला वाटते की, हे सर्व संघाच्या विजयासाठी खेळतात आणि हेच त्यांच्या यशाचे गुपित आहे.
“भारतीय संघाच्या गोलंदाजीची मानसिकता अशी आहे की, आम्ही नेहमी याबाबत विचार करत असतो की कोणताही सामना कसा जिंकला पाहिजे. हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण प्राथमिकता आहे. आम्ही स्थिती समजण्यात आणि त्यानुसार कार्य करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही प्रत्येक फलंदाजानुसार योजना बनवतो आणि मैदानावर त्याला उतरविण्याचा प्रयत्न करतो,” असे भारतीय गोलंदाजीबद्दल बोलताना इशांत म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
-भल्या भल्यांना न जमणारा कीर्तिमान विराट केला स्थापित, बनला पहिलाच आशियाई सेलिब्रिटी
-आयपीएलमधील ‘या’ संघाला सोडून जायचे होते युवराज सिंगला, नक्की काय होतं कारण
-७० शतके ठोकणाऱ्या विराटसाठी ‘हे’ काम नाही कठीण, घ्या जाणून
ट्रेंडिंग लेख-
-दोन दुर्दैवी फलंदाज जे आयपीएलमध्ये ९९ धावांवर राहिले नाबाद
-या खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी, तीन भारतीयांचाही समावेश
-फक्त ०.०१७ टक्क्यांनी हुकला जेम्स अँडरसनचा जगातील सर्वात मोठा विक्रम