चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये सुरू असलेल्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील शनिवारी दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाचा डाव ३२९ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून रोहित शर्माने १६१ धावांची खेळी केली. तसेच उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ६७ तर रिषभ पंत याने ५८ धावांचे योगदान दिले. त्यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी उतरला पण त्यांना पहिला धक्का लवकर बसला.
भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने इंग्लंड संघाचा सलामीचा फलंदाज रोरी बर्न्स याला ० धावांवर बाद करत भारतीय संघाला शानदार सुरुवात करुन दिली.
पहिल्याच षटकात इंग्लंड संघाला मोठा झटका
भारतीय संघाकडून गोलंदाजीची सुरुवात ईशांत शर्माने केली. त्याने पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रोरी बर्न्स याला ० धावांवर बाद करत पवेलीयनमध्ये पाठवले. ईशांत शर्माने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू अचानक आत आला आणि रोरी बर्न्सच्या पॅडला जाऊन लागला. त्यानंतर भारतीय संघाकडून जबरदस्त अपील करण्यात आली आणि अंपायरने बादचा इशारा दिला.
त्यानंतर इंग्लंड संघाकडून डीआरएस घेण्यात आला. डीआरएसमध्ये स्पष्ट दिसून येत होते की, चेंडू ऑफ स्टंप लाईनच्या बाहेर पडला होता आणि चेंडू स्टंपला हलका स्पर्श होऊन निघत होता. यावरून स्पष्ट दिसत होते की, तो नॉट आऊट आहे परंतु, अंपायर कॉल मुळे त्याला बाद घोषित करण्यात आले.
LBW! ☝️
England lose Rory Burns as @ImIshant strikes in his first over. 👏👏 @Paytm #INDvENG #TeamIndia
Follow the match 👉 https://t.co/Hr7Zk2kjNC pic.twitter.com/J1ejopGuUm
— BCCI (@BCCI) February 14, 2021
IND vs ENG 2021, 2nd Test, Day 2: Rory Burns Wicket https://t.co/SaEAP7PCYU via @bcci
— Shubham Pandey (@21shubhamPandey) February 14, 2021
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व
भारतीय संघाने शनिवारी, सामन्याच्या पहिल्या दिवशी रोहित शर्मा याच्या १६१ धावा आणि अजिंक्य रहाणे याच्या ६७ धावांच्या खेळीमुळे ६ बाद ३०० धावांपर्यंत मजल मारली होती. परंतु दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला भारतीय संघाला अवघ्या २९ धावाच करण्यात आल्या. भारतीय संघाचा खेळ ३२९ धावांवर आटोपला.
त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाकडून कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. केवळ बेन फोक्सने एकाकी नाबाद ४२ धावांची झुंज दिली. इंग्लंडने पहिल्या डावात १३४ धावाच केल्या. त्यामुळे भारताला १९५ धावांची आघाडी मिळाली. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
यानंतर भारताने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाखेर १ बाद ५४ धावा केल्या आहेत. तसेच २४९ धावांची आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दुसऱ्या सामन्यात १७ धावांनी विजय मिळवत वेस्ट इंडिजचा बांगलादेशला व्हाईटवॉश
आर अश्विनच्या गोलंदाजीविरुद्ध शुन्यावर बाद तर झालाच पण ब्रॉडने ‘हा’ नकोसा विक्रमही केला
रिषभ पंतचा ‘तो’ षटकार पाहून कर्णधार विराट कोहलीही झाला अवाक्, पाहा व्हिडिओ