विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला २० दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे. संघातील खेळाडू सध्या मौज-मस्ती करताना दिसून येत आहेत. त्यानंतर येत्या ऑगस्ट महिन्यात भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे भारतीय संघातील सर्व खेळाडू फिट असणे गरजेचे आहे. अशातच या मलिकेपूर्वी भारतीय संघाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला दुखापत झाली होती. सामन्यातील शेवटच्या डावात क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या बोटाला चेंडू लागला होता. दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. पुढे त्याच्या बोटांना २ टाके देखील पडले होते.
परंतु संघ व्यवस्थापकांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, ईशांत शर्माची दुखापत इतकी गंभीर नव्हती. भारतीय संघातील खेळाडूंची सुट्टी संपल्यानंतर क्रिकेटपटू डरहममध्ये सरावाला सुरुवात करणार आहे. यासोबतच भारतीय संघाला काउंटी संघासोबत एक किंवा दोन सराव सामने खेळण्याची संधी मिळू शकते.(Ishant Sharma will be fine before the test series against England)
ईशांत शर्माने मोडला कपिल देव यांचा विक्रम
ईशांत शर्माच्या बोटाला लावण्यात आलेले टाके येत्या आठवड्याच्या सुरुवातीला काढून टाकण्यात येतील. टाके काढल्यानंतर ईशांत शर्माला सराव करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तो ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणार कसोटी मालिकेत खेळताना दिसू शकतो.
त्याच्या नावे इंग्लंडमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम आहे. याबाबतीत त्याने दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांना मागे टाकले आहे. हा कारनामा त्याने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केला होता.
असा आहे इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला, केएस भारत
महत्वाच्या बातम्या-
धवन ब्रिगेडला ‘दुय्यम दर्जा’चा संघ संबोधणाऱ्या क्रिकेटरला श्रीलंका बोर्डाचे सणसणीत उत्तर
जेव्हा सगळ्या टीम इंडियाला सोडलं, पण हरभजन सिंगला मात्र न्यूझीलंडच्या विमानतळावर पकडलं
क्वारंटाईन संपवून ‘टीम धवन’ सरावासाठी उतरली मैदानात, फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ