---Advertisement---

इशांत शर्माच्या यॉर्करवर रसेल तोंडघशीच पडला! आऊट झाल्यानंतची प्रतिक्रिया व्हायरल

---Advertisement---

आयपीएल 2024 च्या 16 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली. कोलकाताला सनरायझर्स हैदराबादचा 277 धावांचा विक्रम मोडता आला नसला तरी, केकेआरच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत स्कोअरबोर्डवर 272 धावा लगावल्या.

सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंह आणि आंद्रे रसेल यांनी केकेआरला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. आंद्रे रसेलनं 19 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 41 धावांची खेळी खेळली, मात्र त्याला इशांत शर्मानं एका अप्रतिम यॉर्करवर क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. आऊट झाल्यानंतर रसेलची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

19 व्या षटकापर्यंत केकेआरची धावसंख्या 5 विकेटवर 264 धावा होती. इशांत शर्मा डावातील शेवटचं षटक टाकण्यासाठी आला. इशांतनं षटकातील पहिलाच चेंडू अचूक यॉर्कर लेन्थवर टाकला. आंद्रे रसेलला मोठा फटका मारायचा होता, परंतु यॉर्कर चेंडूवर त्यानं आपला तोल गमावला. इशांतच्या अचूक यॉर्करनं रसेलच्या विकेट्स विखुरल्या अन् तो तोंडघशी पडला. बाद झाल्यानंतर रसेलनं टाळ्या वाजवून इशांतच्या अचूक यॉर्कर गोलंदाजीचं कौतुक केलं. समालोचकही हा यॉर्कर पाहून हैराण झाले होते. आता सोशल मीडियावर लोक इशांत शर्माच्या या चेंडूचं कौतुक करत आहेत.

 

इशांत शर्मानं डावाच्या शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी करत केवळ 8 धावा दिल्या, ज्यामुळे केकेआर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या बनवू शकला नाही. यासह त्यानं या षटकात 2 महत्त्वपूर्ण विकेट्सही घेतल्या. इशांतनं रसेलसह रमनदीप सिंगची विकेट घेतली.

मात्र याच सामन्यात सलामीवीर सुनील नारायणनं इशांतच्या एका षटकात 26 धावा ठोकल्या होत्या. नारायण आज चांगलाच टचमध्ये दिसला. त्यानं डावाच्या तिसऱ्या षटकात इशांतला 3 षटकार आणि 2 चौकार मारून 26 धावा केल्या. नारायण 39 चेंडूत 85 धावा करून बाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

सुनील नारायणच्या अंगात आलं! केवळ 21 चेंडूत अर्धशतक, इशांतला एकाच षटकात चोपल्या 26 धावा

कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? दिल्लीविरुद्ध आयपीएलच्या पहिल्याच डावात ठोकलं तुफानी अर्धशतक

सात वर्षांचा ‘थाला’! एकापाठोपाठ एक मारतो हेलिकॉप्टर शॉट! व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---