आजच्याच दिवशी (२ सप्टेंबर) ३२ वर्षांपुर्वी दिल्ली येथे भारताच्या एका दमदार वेगवान गोलंदाजाचा जन्म झाला होता. हा गोलंदाज म्हणजे, इशांत शर्मा. ६ फूट ४ इंच उंची असेल्या या गोलंदाजाने वयाच्या १९व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले होते. याच कारणामुळे त्याने वयाच्या ३२व्या वर्षापर्यंत तब्बल ९७ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २९७ विकेट्स घेतल्या आहेत. तर, वनडेत त्याने ८० सामने खेळत ११५ विकेट्स आणि टी२०त १४ सामने खेळत ८ विकेट्सची आपल्या खात्यात नोंद केली आहे.
तसं तर, इशांतने त्याच्या आतापर्यंतच्या १३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. मग, ते २०१३सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामना असो किंवा श्रीलंकाविरुद्ध त्यांच्याच मायदेशात त्यांना कसोटीत दाखवलेला पराभव असो. पण, त्याच्या कारकिर्दीतील पहिल्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू रिकी पाँटिंगविरुद्ध केलेल्या गोलंदाजीसाठी त्याची आजही आठवण काढली जाते.
इशांतच्या ३२व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्या कारकिर्दीतील त्या अविस्मरणीय किस्स्याची आठवण करुन देणार आहोत. Ishant Sharma’s Cricket Career Unforgettable Moment
ही गोष्ट आहे १२ वर्षांपुर्वीची. तेव्हा भारतीय संघ बलाढ्य अशा ऑस्ट्रेलिया संघाच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात आली होती. या मालिकेतील तिसरा सामना हा जगातील सर्वात वेगवान खेळपट्टी असणाऱ्या पर्थच्या मैदानावर झाला होता. अशात भारतीय संघाचे ४ वेगवान गोलंदाज मैदानावर उतरले होते. यामध्ये इशांतचा समावेश होता.
इशांतने त्या कसोटी सामन्यात जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या रिकी पाँटिंगला हैरान करुन सोडले होते. १०वी बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेल्या इशांतने पर्थच्या खेळपट्टीवर १४५ किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी केली होती. कसोटी सामन्यात आपल्या फलंदाजीने गोलंदाजांना घाम आणणारा पाँटिंग त्या सामन्यात धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसला होता. इशांतने त्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात पाँटिंगला अर्धशतकी खेळीदेखील करु दिली नव्हती आणि दोन्ही डावात आपल्या गोलंदाजीवर त्याला बाद केले होते. एवढेच नव्हे तर, इशांतने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत पाँटिंगची तब्बल ८वेळा विकेट घेतली आहे.
२०११-१२ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही इशांतने मोठा कारनामा केला होता. यावेळी त्याने तब्बल १५२.२ किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी केली होती. हा कोणत्या भारतीय गोलंदाजाने टाकलेल्या सर्वात वेगवान चेंडूंपैकी एक आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अखेर इंग्लंड विश्वविक्रम करण्यापासून थोडक्यात चुकले, नाहीतर….
सचिनच्या आयपीएलमधील विकेटने ‘त्या’ भारतीय गोलंदाजाला मिळाले होते अतिशय महागडे गिफ्ट
क्वारंटाईनमध्ये असलेल्या दीपक चाहरने शेअर केला व्हिडिओ म्हणाला, मी आता…
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: युएईतील मैदान गाजवणार हे ५ गोलंदाज, फलंदाजांची करणार दांडी गुल
आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहेत हे ३ परदेशी खेळाडू
असे ५ परदेशी क्रिकेटर, जे आयपीएलमधून कमवतात सर्वाधिक पैसे