इंडियन सुपर लीगचा यंदाच्या मोसमात वाढ झाली असून हा चौथा मोसम पाच महिने चालणार आहे. यात दोन नवीन संघाला स्पर्धेत सामावून घेतले आहे. भारतीय फुटबॉल इतिहासात खूप जुनी असणारी आय लीग स्पर्धेतून इंडियन सुपर लीगमध्ये आलेला बेंगलुरू एफ. सी आणि जमशेदपूर एफ. सी. हे दोन नवीन इंडियन सुपर लीगमध्ये नव्याने दाखल झाले आहेत.
स्पर्धेच्या नवीन नियमानुसार संघातील भारतीय खेळाडू ठेवण्यात आता मर्यादा येणार असून आता फुटबॉल संघ फक्त १५ ते १८ भारतीय खेळाडू संघात ठेवू शकणार आहे. तर तुम्हाला तुमच्या संघातील दोन सिनिअर खेळाडू ठेवण्याची परवानगी आहे. अंडर २१चे कमीतकमी दोन खेळाडू संघाने घडवण्यासाठी संघात कायम करायचे आहेत. जास्तीत ३ अंडर २१चे खेळाडू संघात ठेवता येतील. दिल्ली डायनॅमो आणि जमशेदपूर एफ सी संघाने अजून कोणताच खेळाडू कायम ठेवला नाही. हे संघ ड्रॅफ्टिंगच्या पुढील फेऱ्यातून संघातील खेळाडू निवडणार आहेत. ड्रॅफ्टिंगच्या तिसऱ्या फेरीपर्यंतची खेळाडूंची यादी तयार झाली आहे.
फुटबॉल संघानी कायम केलेल्या खेळाडूंची यादी
अटलेटिको डी कोलकाता
सिनियर खेळाडू:१देबजीत मुजामदार ,२प्रबीर दास
अंडर २१:-अद्याप निवडला नाही
बेंगलूरु एफ सी
सिनियर खेळाडू:१सुनील छेत्री, २उदांता सिंग
अंडर २१:१ निशू कुमार,२ मॉलसवझुला
चेन्नैयिन एफ सी
सिनियर खेळाडू:१जेजेलाल पेखळलूवा,२करंजीत सिंग
अंडर २१:१जेरीलाल रिझुवाना,२अनिरुद्ध थापा
दिल्ली डायनॅमो
सिनियर खेळाडू:-अद्याप निवडला नाही.
अंडर २१:-अद्याप निवडला नाही.
एफ सी गोवा
सिनियर खेळाडू: १लक्ष्मीकांत कट्टीमनी, २मंदार राव देसाई
अंडर २१:अद्याप निवडला नाही.
एफ सी पुणे सिटी
सिनियर खेळाडू:१विशाल कैथ
अंडर २१:आशिक करुनियान
केरळ ब्लास्टर
सिनियर खेळाडू: १सि.के. विनीत,२संदेश झिंगन
अंडर २१:प्रशांत कादुथडाथकुनी
मुंबई सिटी एफ सी
सिनियर खेळाडू:१अमरिंदर सिंग२, शेहनाज सिंग
अंडर २१:अद्याप निवडला नाही.
नॉर्थ ईस्ट युनाइटेड
सिनियर खेळाडू:१ टी.पी रेहनेश ,रोलिंग बार्जेस
अंडर २१:अद्याप निवडला नाही.
जमशेदपूर एफ सी
सिनियर खेळाडू:अद्याप निवडला नाही.
अंडर २१:अद्याप निवडला नाही.