---Advertisement---

“ब्रिस्बेन कसोटी सामन्यावर चित्रपट बनवा”, या बॉलिवूड अभिनेत्याने केली मागणी

---Advertisement---

ब्रिस्बेन।  ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना ‘द गॅबा’ स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३२ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघातील जवळपास ९ प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असताना युवा भारतीय संघाने अनुभवी ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघाचे सर्वत स्तरातून अभिनंदन करण्यात आले.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने अनोख्या शुभेच्छा देताना, भारताच्या ब्रिस्बेन विजयावर एखादा चित्रपट बनला पाहिजे असे म्हटले आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने भारतीय संघाचा फोटो शेअर करताना त्याला कॅप्शन दिले आहे की ‘या सामन्यावर तर चित्रपट बनायला हवा. काय अफलातून ऐतिहासिक विजय होता.’

https://www.instagram.com/p/CKOGA0qJfgq/

केवळ कार्तिक आर्यननेच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे. बीग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी देखील कौतुक केल आहे.

बादशाहा म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहरुख खानने चक दे इंडिया म्हणत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.

मराठमोळ्या रितेश देशमुखने ‘इंडिया जिंदाबाद. टीम इंडिया आम्हाला तुमचा अभिमान वाटतो’, असे म्हणत शुभेच्छा दिल्या.

अन्य कलाकारांनी दिलेल्या शुभेच्छा – 

https://www.instagram.com/p/CKOCbJDBQWA/?utm_source=ig_embed

ब्रिस्बेनमध्ये असा मिळवला विजय – 

ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर ३६९ धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने शार्दुल ठाकून (६७) आणि वॉशिंग्टन सुंदर (६२) यांच्या शतकी भागीदारीसह पहिल्या डावात ३३६ धावा केल्या.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २९४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद सिराजने या डावात सर्वाधिक ५ विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ३२८ धावांचे आव्हान दिले होते.

प्रत्युत्तरात भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतने ८९ धावांची नाबाद खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरने २२ धावा करत चांगली साथ दिली. तर चेतेश्वर पुजाराने भक्कम बचावात्मक खेळी करताना ५६ धावा केल्या. त्यामुळे भारताला हे आव्हान पार करता आले आहे.

ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने २ विकेट्स आणि जोश हेजलवूडने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

आयसीसी क्रमवारी : विराट कोहलीची घसरण; गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीतील टॉप-३ मधून बाहेर

हरभजन सिंगचा CSK सोबतचा प्रवास संपला, भावनिक ट्विट करत दिली माहिती

भारतीय संघाच्या जसप्रीत बुमराहसह ‘या’ गोलंदाजाला झाला आयसीसी क्रमवारीत फायदा; पाहा कोण आहे अव्वलस्थानी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---