---Advertisement---

टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत पुनरागमन करणे कठीण, पाहा काय सांगते आकडेवारी

On: सोमवार, डिसेंबर 21, 2020 12:02 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान 17 डिसेंबर पासून बहुप्रतिक्षित 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली. ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा 8 विकेटने पराभव केला. सामन्यात पहिले दोन दिवस आघाडीवर असलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जॉश हजलेवुड आणि पॅट कमिंस यांच्यासमोर अक्षरशः नांगी टाकली.

भारताचा दुसरा डाव केवळ 36 धावा धावांवर आटोपला. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने केवळ 2 गडी गमावत अगदी सहजपणे धावांचा पाठलाग पूर्ण केला. भारतीय संघाच्या या निराशाजनक कामगिरीमुळे अनेक क्रिकेट रसिकांत नाराजीचा सूर उमटला आहे, त्याच वेळी काही माजी खेळाडू भारतीय संघ पुनरागमन करेल अशी अपेक्षा बाळगून चाहत्यांना भारतीय संघावर विश्वास ठेवण्याचे आवाहन करत आहेत. मात्र आकड्यांवर नजर टाकली असता भारतीय संघाचे पुनरागमन तितकेसे सोपे वाटत नाही

आशिया बाहेर भारताने मालिकेतील पहिला कसोटी सामना हरल्यानंतर आतापर्यंत एकदाही मालिका विजय मिळवलेला नाही. आजपर्यंत आशिया बाहेर झालेल्या 34 कसोटी मालिकांमध्ये भारताने पहिला सामना गमावलेला आहे. या 34 मालिकांपैकी 31 मालिकांत भारताला पराभव पत्करावा लागला आहे, तर उरलेल्या तीन मालिका भारतीय संघ बरोबरीत सोडवण्यात यशस्वी ठरला. पण मालिका विजय मात्र एकदाही साकारता आला नाही.

या आकड्यांबरोबरच पहिल्या सामन्यातील निराशाजनक कामगिरी विसरणे देखील संघासाठी अवघड जाणार आहे. पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघ केवळ 36 धावांवर बाद झाला. ही भारतीय संघाची कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक नीचांकी धावसंख्या ठरली.

मागील 96 वर्षात असे पहिल्यांदा घडले होते की एखाद्या संघातील कोणताही खेळाडू एका डावात दुहेरी धावसंख्या देखील करू शकला नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघ पुनरागमन कशाप्रकारे करतो याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून आहे

दरम्यान मालिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर होणार आहे. नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार असल्याने या सामन्यात भारतीय संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

ऍडलेड कसोटी सामन्यात का घातले होते शमीने फाटलेले शूज? ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले कारण

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया देखील त्रस्त, ‘या’ खेळाडूच्या खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम

विराट कोहली आणि पृथ्वी शॉ ऐवजी ‘या’ दोन खेळाडूंना मिळावी टीम इंडियात संधी, दिग्गजाची मागणी

ट्रेंडिंग लेख –

मराठीत माहिती- क्रिकेटर के श्रीकांत

तीन भारतीय शिलेदार ज्यांनी कसोटीत सर्वात कमी डावात केल्या १००० धावा पूर्ण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---