भारतीय क्रिकेटला आजपर्यंत अनेक दिग्गज कर्णधारांचा वारसा लाभला आहे. त्यातही एमएस धोनीने कर्णधार म्हणून सर्वाधिक यश मिळवले. त्याने ३ आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धा जिंकून इतिहास रचला. धोनीने कर्णधार म्हणूनच नाही तर एक यष्टीरक्षक कर्णधार म्हणूनही अनेक विक्रम रचले. पण नुकतेच किरण मोरे यांनी धोनीच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या दिवसाबद्दल एक खुलासा केला आहे.
भारताचे माजी निवडकर्ते किरण मोरे यांनी महेंद्रसिंह धोनीबद्दल सांगताना एका गोष्टीचा गौप्यस्फोट केला. त्यांनी सांगितले की, धोनीची कशा प्रकारे निवड केली आणि धोनीला यष्टिरक्षक म्हणून खेळवण्यासाठी सौरव गांगुलीला कसे मनवले. मोरे यांनी सांगितलं की, २००४ सालादरम्यान संघाला एका आक्रमक फलंदाज आणि यष्टिरक्षकाची गरज होती. काहीजणांना माहिती नसेल पण मोरे यांनीच धोनीची निवड भारतीय संघात केली आहे.
किरण मोरे यांनी एका युट्यूबच्या कार्यक्रमात सांगितले की आम्हाला अशा यष्टिरक्षकाची आणि फलंदाजी गरज होती की जो 6 किंवा 7 क्रमांकावर ही उत्कृष्ट कामगिरी करेल आणि संघासाठी 40-50 धावा सहज करेल. राहुल द्रविडनी यष्टिरक्षक म्हणून एकूण 75 सामने खेळले आहेत. त्यांनी 2003 चा विश्वचषक ही खेळा आहे.
किरण मोरे यांनी सांगितला की, त्यावेळेस दुलीप ट्रॉफीमध्ये पूर्व विभागाचे दिपदास गुप्ता यष्टिरक्षक होते. यांनी भारतीय संघात पदार्पण केले होते. त्यांच्या जागी धोनीला यष्टिरक्षक म्हणून स्थान देण्यासाठी मोरे यांना गांगुलीला तयार करण्यासाठी 10 दिवस लागले.
ते पुढे म्हणाले की, जेव्हा आम्ही धोनीची निवड करण्यासाठी गेलो. तेव्हा त्यांच्या संघाचा सामना चालू होता आणि संघाने 170 धावा केल्या होत्या आणि त्यात धोनीच्या 130 धावा होत्या. मला दीपदास गुप्ता आणि गांगुलीला समजवायला १० दिवस गेले, त्यांच्यात आणि माझ्यात वाद ही झाला. परंतु त्यांना मी तयार केले.
मोरे पुढे म्हणले की, धोनीनी पूर्व विभागाकडून उत्तर विभागा विरुद्धचा सामना खेळला. त्यामध्ये धोनीने यष्टिरक्षणही केले आणि उत्कृष्ट फलंदाजी ही केली. धोनीनी प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध धावा काढल्या होत्या. धोनीने आशिष नेहराच्या गोलंदाजीवरही धावा काढल्या. त्यानंतर धोनीला भारतीय अ संघासह केनियाला पाठवले, जिथे त्यानी भारताची मान उंचावली. धोनीने तिथे 600 धावा काढल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
बॅटिंगपेक्षा ती जास्त आवडते का? राशिदने टाकली ‘या’ भारतीय फलंदाजाला गुगली
लॉर्डस कसोटीत इंग्लंडने परिधान केली काळी जर्सी, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक
कमनशिबी आरसीबी! ‘या’ पाच खेळाडूंना रिलीज करताच पुढच्या वर्षी त्यांनी जिंकली आयपीएल ट्रॉफी