स्वीडन विरुद्ध इटली सामना दोन्ही संघांच्या विश्वचषक २०१८ चे टिकीट होता. दोन लेग मध्ये होणारी पात्रता फेरी संघांचे भवितव्य ठरवणार होते. पहिल्या फेरीत १-० ने स्वीडनने बढत मिळवली होती.
दुसऱ्या फेरीत सामना ०-० असा गोलविरहित झाला आणि स्वीडन १-० अशी बढत घेऊन विश्वचषकास पात्र ठरली तर इटलीला घरचा रस्ता दाखवला. इटली बरोबरच चिली आणि नेदर्लंड सुद्धा विश्वचषकास पात्र ठरले नाहीत. नेदर्लंडच्या आरेन रॉबेनने देखील या बरोबर आपली निवृत्ती घोषित केली.
१९५८ नंतर प्रथमच इटली विश्वचषक खेळणार नाही. विशेष म्हणजे १९५८ चा विश्वचषक स्वीडनमध्ये झाला तर या वर्षी सुद्धा स्वीडननेच इटलीला बाहेरचा रस्ता दाखवला.
स्वीडन हा पहिला युएफा देश आहे ज्याने विश्वचषक पात्रतेसाठी तीन विश्वचषक अंतिम सामन्यात खेळलेल्या संघांबरोबर सामने खेळले. यात फ्रांस, नेदर्लंड आणि इटली या संघांचा समावेश आहे.
४ वेळा विश्वचषक विजेत्या इटली संघाचा धक्कादायक पराभव संघातील खेळाडूंच्या चांगलाच जिव्हारी लागला. दिग्गज गोलकीपर बुफाॅन बरोबरच डी रोसी, बारझाकी आणि चेलीनीने सुद्धा निवृत्तीची घोषणा केली.
आपणास हे माहित नसेल तर :
# या पूर्वी विश्वचषक विजेता उरुग्वे संघ देखील २००६ साली अंतिम फेरीत जाण्यास अपात्र ठरला होता.
# इंग्लड आणि फ्रान्स हे दोन्ही संघ १९९४ साली पात्रता फेरीतून बाहेर पडले होते.
नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)