दिग्गज भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याने गुरुवारी (08 सप्टेंबर) त्याच्या शतकाचा दुष्काळ संपवला. विराटने अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या आशिया चषक 2022 च्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात विराट कोहली याने झंझावाती शतक झळकावले. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला 101 धावांनी पराभूत केले आणि आशिया चषकाचा गोड शेवट केला. या शानदार खेळीनंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने विराटची मुलाखत घेतली.
या मुलाखतीत विराटने बरेचसे खुलासे केले. दरम्यान दोघांमध्ये गमतीशीर संभाषणही झाले. विराटने रोहितच्या हिंदी भाषेवरून त्याची थोडी मजाही घेतली.
रोहितने मुलाखतीत हिंदी भाषेथ विराटला म्हटले की, “विराट खूप खूप शुभेच्छा. तुझ्या 71व्या शतकाची संपूर्ण भारताला प्रतिक्षा होती. मलाही माहिती आहे की, या सर्वांपेक्षा जास्त तू तुझ्या शतकाची वाट पाहात होतास. तू इतकी वर्षे या खेळात घालवली आहेस, त्यावरून आम्हाला माहिती होते की, हा मैलाचा दगड तू नक्कीच पार करतील. परंतु अफगाणिस्तानविरुद्धची तुझी जी खेळी होती, ती खूपच खास होती. आपल्याला विजयासह आशिया चषकाचा शेवट करायचा होता.”
“तुझ्या या खेळीदरम्यान बरेच काही पाहायला मिळाले, तू चांगले गॅप्स शोधले, चांगले शॉट्स मारले, चांगल्या गोलंदाजांना टार्गेट केले. तुझ्या खेळीबद्दल तू काय सांगशील या खेळीची सुरुवात कशी झाली? आणि तू ती पुढे कशी नेली?”
What happens when @ImRo45 interviews @imVkohli ☺️ 👏
Laughs, mutual admiration & a lot of respect 😎- by @ameyatilak
Full interview 📽️https://t.co/8bVUaa0pUw #TeamIndia | #AsiaCup2022 | #INDvAFG pic.twitter.com/GkdPr9crLh
— BCCI (@BCCI) September 9, 2022
रोहितच्या तोंडून इतके शुद्ध हिंदी ऐकून विराटही चकित झाला. त्याने रोहितने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी त्याला ट्रोल केले. तो म्हणाला की, “माझ्यासोबत आज पहिल्यांदाच तू इतकी शुद्ध हिंदी बोलत आहेस. असे म्हणून विराट खदखदून हसायला लागला.”
यावर रोहित म्हणाला की, “मी विचार केला होता की, हिंदी आणि इंग्रजीचे मिश्रण करून बोलावे. परंतु हिंदीचा चांगला रिदम मिळाला आणि मग मी म्हटले की, चला असेच चालू देऊ.” बीसीसीआयने या गमतीशीर मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘अंतिम सामना खेळायचा होता पण…’, आशिया चषकातून बाहेर झाल्यानंतर केएल राहुलने व्यक्त केली खंत
आगामी टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा ‘मेंटर’ म्हणून ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची नियुक्ती
डिविलियर्सला एक दिवसआधीच लागली होती विराटच्या शतकाची चाहूल; म्हणाला, ‘काल त्याला…’