भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (hardik pandya) मागच्या काही दिवसांपासून सतत खराब फॉर्म आणि दुखापतीशी झगडत होता. मागच्या वर्षी टी२० विश्वचषकानंतर त्याने काही काळासाठी संघातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. विश्रांतीच्या काळाता त्याला अनेकदा मैदानात सराव करताना पाहिल गेले आहे. अशात आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये त्याचा जुना अंदाज पुन्हा एकदा दिसण्याची अपेक्षा चाहत्यांना आहे. हार्दिकने मधल्या काळात घेतलेल्या विश्रांतीविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
बायो बबलमध्ये राहणे सोपे नाही.
हार्दिकच्या मते, या विश्रांतीच्या काळात त्याने स्वतःला शारीरिक आणि मानसिक स्वरूपात तयार करण्यासाठी वेळ घालवला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, “मी संघाचा विचार करून माझ्या तयारीला घाई केली आहे. परंतु, यावेळी मी काही काळाची विश्रांती स्वतःला मानसिक आणि शारीरिक स्वरूपात तयार करण्यासाठी घेतली होती. मला माझ्या कुटुंबासाठी काही वेळ काढायचा होता. आम्ही बायो बबलमध्ये खूप वेळ घालवतो. प्रत्येक जण आमच्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नात असतो, पण बायो बबलमध्ये राहण कठीण आहे.”
हार्दिक पंड्याच्या मते, त्याने नेहमीत शांततेत मेहनत घेतली आहे आणि यापुढेही तो याच मार्गाने जाणार आहे. “तुम्ही खूप काळासाठी कुटुंबापासून दूर राहता आणि याच कारणास्तव तुम्हाला अडचण निर्माण होते. मला स्वतःसाठी वेळ हवा होता. ज्यामुळे मला समजेल की, मला कुठे काम करायचे आहे आणि कुठे सुधारणा करायची आहे. मी दररोज दोन सत्रांमध्ये सराव करतो. मी नेहमीच शांततेत मेहनत घेतली आहे आणि पुढेही तेच करेल.” असे हार्दिक पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान हार्दिक पंड्याने आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून तो केवळ एकाच संघासाठी खेळला. त्या संघाचे नाव म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्ससाठी खेळताना त्याला स्वतःची ओळख मिळाली. पुढे त्याने २०१६ साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. परंतु मागच्या दोन आयपीएल हंगामातील खराब प्रदर्शन पाहून मुंबई संघाने त्याला पुढच्या हंगामासाठी रिटेन केले नाही. अशात आयपीएलमध्ये नव्याने सामील होणाऱ्या अहमदाबाद फ्रेंचायझीने त्याला स्वतःसोबत सामील केले आणि संघाचे कर्णधारपद देखील सोपवले.
महत्वाच्या बातम्या –
शुबमन गिलला रिलीज केल्याचा केकेआरला होतोय पश्चाताप! कोच मॅक्युलम म्हणाला…
‘या’ आहेत आयपीएल संघांच्या सर्वात सुंदर मालकिणी; कोणी अभिनेत्री तर कोणी…
इयान चॅपलकडून विराट कोहलीचे कौतुक, म्हणाले – तो सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक होता
व्हिडिओ पाहा –