न्यूझीलंड क्रिकेट संघाला नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत दारूण पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले. या पराभवानंतर न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आंद्रे ऍडम्स याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याच्याबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर न्यूझीलंड संघ असल्याचा मुकाबला करू शकला नाही व तिन्ही सामन्यात पराभूत झाला. संघाला दोन विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेणारा कर्णधार असलेल्या केन विलियम्सन याला नेतृत्व आणि फलंदाजी या दोन्हीत योगदान देता आले नाही. त्याच्या खराब कामगिरीनंतर आता त्यावर टीका होऊ लागली आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आंद्रे ऍडम्सने न्यूझीलंड क्रिकेटच्या संकेतस्थळाशी बोलताना विलियम्सनच्या भवितव्याविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले. ऍडम्स म्हणाला,
“त्याने तुम्हाला अपेक्षित असलेल्या धावा केल्या नाहीत. गेल्या 18 महिन्यांपासून तो कठीण प्रसंगातून जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्या आयुष्यात कुटुंब आणि मुलांसह सर्वकाही बदलले आहे. यामुळे तुमचा दृष्टीकोन थोडा बदलतो. मागील काही काळ त्याच्यासाठी अपेक्षित राहिला नाही. यामुळे कदाचित तो क्रिकेटच्या एका प्रकाराला अलविदा करू शकतो.”
ऍडम्स पुढे बोलताना म्हणाला,
“मला वाटते की, सध्या न्यूझीलंड क्रिकेटला नव्या कर्णधाराची गरज आहे. असे झाल्यास केन फलंदाजीवर जास्त लक्ष केंद्रित करू शकतो. त्याला नक्कीच या पदाचा अहंकार नाही. तो कर्णधारपदाला चिकटून बसणारा व्यक्ती नाही. रॉस टेलरने नेतृत्व सोडल्यानंतर ज्या गोष्टी घडलेल्या त्या यावेळी होणार नाहीत.”
न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी मागील टी20 विश्वचषकानंतर चांगल्या गोष्टी घडलेल्या नाहीत. विदेशातील दौऱ्यावर त्यांना सातत्याने अपयश आले आहे. तसेच, केन विलियम्सन हा देखील बऱ्याच काळापासून आपल्या फॉर्मशी झगडतोय. यापूर्वी देखील तो आगामी टी20 विश्वचषकानंतर नेतृत्व सोडणार असल्याची चर्चा सुरू होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022: पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी श्रीलंकेने कसली कंबर; कॅप्टन शनाका म्हणाला, ‘टॉस हरलो तरी…’
षटकार ठोकल्यावर स्मिथने केलेल्या कृतीने सारेच झाले चकीत; पाहा व्हिडिओ
आशिया चषकात का शांत आहे बाबर आझमची बॅट? खुद्द प्रशिक्षकांनीच सांगितलेय कारण