---Advertisement---

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ सातत्याने विजय का मिळवत आहे? ‘या’ भारतीय दिग्गजाने सांगितले कारण

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या ३३० धावांचा पाठलाग करण्यास इंग्लिश संघाला अपयश आले. यासोबतच भारतीय संघाने वनडे मालिका २-१ ने आपल्या नावावर केली. वनडे मालिकेआधी टी२० आणि कसोटी मालिकेतही भारतीय संघाने इंग्लंड संघाला धूळ चारली होती. मात्र, त्याचवेळी भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ सातत्याने का विजय मिळवत आहे, याचे कारण सांगितले.

…म्हणून विराट यशस्वी कर्णधार
भारताचे सर्वकालीन महान फलंदाज व सध्या समालोचन करणारे सुनील गावसकर यांनी इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेनंतर प्रसारण वाहिनीशी बोलताना खुलासा केला की, “मी कायम असे म्हणतो की, एक कर्णधार तितकाच शानदार असतो जितका उत्कृष्ट संघ त्याच्याकडे असतो. सध्या विराटकडे एक लाजवाब संघ आहे. सलामीसाठी त्याच्याकडे बरेच पर्याय आहेत. मधल्या फळीत उत्कृष्ट फलंदाज असून, फटकेबाज यष्टीरक्षकांची त्याला साथ मिळते. संघाचे क्षेत्ररक्षण ही देखील जमेची बाजू आहे. संघाचे सर्व गोलंदाज सध्या अफलातून कामगिरी करताना दिसत आहेत.”

गावसकर पुढे बोलताना म्हटले, “संघाचे सध्या संतुलन योग्य आहे. संघ संतुलित असेल तर तुम्ही कमी सामने गमावता. क्रिकेटमध्ये कधीही सर्वच्या सर्व ११ खेळाडू यशस्वी होत नाहीत. दोन फलंदाज व दोन गोलंदाज त्यादिवशी खेळले की संघ सामना जिंकत असतो. संघाकडे अनेक मॅचविनर आहेत आणि ते सामन्यावेळी दिसून येते.”

भारताने इंग्लंडला दिला व्हाईट वॉश
मागील दोन महिन्यांपासून भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाला या दौऱ्यात व्हाईट वॉश घेऊन जावे लागले. चार सामन्यांची कसोटी मालिका भारतीय संघाने ३-१, पाच सामन्यांची टी२० मालिका ३-२ तर, तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ अशा फरकाने भारतीय संघाने आपल्या नावे केली.

महत्त्वाच्या बातम्या –

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ३०० धावा बनविणारे संघ, भारत ‘या’ स्थानावर

असं नक्की घडलं काय की विराट आणि वूडमध्ये पेटला वाद, चाहत्यांनाही पडला प्रश्न

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमुळे भारत-इंग्लंडच्या मालिकेतील कॉमेंट्री पॅनलवर कोरोनाचा धोका, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---