आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहिर केले आहे.
जॉन्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2015 मध्येच निवृत्ती घेतली होती. परंतू त्याने जगभरातील टी20 लीगमध्ये त्याचा खेळ सुरु ठेवला होता. पण आता त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे.
जॉन्सनने यावर्षी सुरुवातीलाच झालेल्या बीगबॅश लीगमधून जुलैमध्ये निवृत्ती घेतली होती. तसेच यावर्षी तो आयपीएल 2018 मध्ये कोलकता नाइट रायडर्स संघाकडूनही खेळला होता.
त्याने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारत असल्याचे पर्थ नाऊ वेबसाईटला माहिती दिली आहे. त्याने सांगितले, “आता सर्व संपले आहे. मी माझा शेवटचा चेंडू टाकला आणि मी माझी शेवटची विकेटही घेतली. आज मी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित करीत आहे.”
“मला आशा होती की पुढच्या वर्षीच्या मध्यापर्यंत मी विविध टी20 स्पर्धा खेळेल. पण सत्य हे आहे की माझे शरिर थकले आहे.”
बीगबॅश लीगमध्ये पर्थ स्कोचर्स संघाकडून खेळल्यानंतर जॉन्सनने बीगबॅश लीगमधून निवृत्ती घेतली होती. याबद्दल तो म्हणाला, “जेव्हा मी पर्थ स्कोचर्सच्या प्रशिक्षक अॅडम व्होग्सबरोबर बसलो होतो तेव्हा माझ्या भविष्याविषयी आम्ही चर्चा केली.”
“ते मला पुढच्या वर्षी खेळताना बघण्यास उत्सुक होते. मला अजूनही विश्वास आहे की मी खेळणाऱ्या संघाला माझ्या अनुभवासह मदत करेल. पण मला वाटते मी मानसिकरित्या थकलो आहे.”
त्याचबरोबर जॉन्सन म्हणाला, “जर मी 100 टक्के खेळू शकत नसेल तर मी संघाला माझे सर्वोत्तम देऊ शकत नाही. माझ्यासाठी संघ महत्त्वाचा आहे.
निवृत्तीनंतरच्या कारकिर्दीबद्दल जॉन्सन म्हणाला, “माझ्यातील खेळाडू मला सोडणार नाही त्यामुळे आशा आहे की मी याचा उपयोग भविष्यात प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन करण्यासाठी करेल. क्रिकेट माझी ताकद आहे.”
अशी आहे जॉन्सनची कारकिर्द-
कसोटी – सामने 73 – गोलंदाजी: विकेट्स-313, सरासरी- 28.40, फलंदाजी: धावा – 2065
वनडे – सामने 153 – गोलंदाजी: विकेट्स – 239 , सरासरी – 25.26 , फलंदाजी: धावा – 951
आंतरराष्ट्रीय टी20 – सामने 30 – गोलंदाजी: विकेट्स-38, सरासरी- 20.97, फलंदाजी: धावा-109
प्रथम श्रेणी – सामने117 – गोलंदाजी: विकेट्स-465, सरासरी- 28.71, फलंदाजी: धावा – 3180
अ दर्जाचे क्रिकेट – सामने 184 – गोलंदाजी: विकेट्स-284, सरासरी- 26.01, फलंदाजी: धावा-1115
ट्वेंटी20 – सामने 112 – गोलंदाजी: विकेट्स-123, सरासरी- 25.78, फलंदाजी: धावा – 320
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–तिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा
–म्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी
–एशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक