---Advertisement---

मंधना-हरमनप्रीत जोडीने जिंकली सर्वांचीच मने, युवराज-सचिनकडूनही कौतुक; पाहा खास ट्वीट्स

Smriti-Mandhana-and-Harmanpreet-Kaur
---Advertisement---

भारतीय महिला संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर आणि सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधाना यांनी शनिवारी (१२ मार्च) न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषकात वेस्ट इंडीजविरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केले. महिला विश्वचषक २०२२ मधील हा १० वा सामना होता आणि यामध्ये भारतीय संघाने १५५ धावांनी वेस्ट इंडीजला मात दिली. स्म्रीती आणि हरमनप्रीतने कौतुकास पात्र असे प्रदर्शन केले आणि यासाठी भारतीय संघाचे माजी दिग्गज त्यांना दाद देत आहेत. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि माजी दग्गज अष्टपैलू युवराज सिंगने या दोघींनी केलेल्या वैयक्तिक शतकांसाठी कौतुक केले.

या दोघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने ८ विकेट्सच्या नुकसानावर ३१७ धावा केल्या. यामध्ये सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिने सर्वाधिक १२३ धावांचे योगदान दिले. यासाठी तिने ११९ चेंडू खेळले आणि १३ चौकर, तर २ षटकारांच्या मदतीने ही धावसंख्या साकारली. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) खेळीचा विचार केला, तर तिने १०७ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या. या दोघांनी वैयक्तिक शतकाव्यतिरिक्त चौथ्या विकेटसाठी १८४ धावांची भागीदारीही केली.

सचिन तेंडुलकने (Sachin Tendulkar) स्वतःच्या अधिकृत ट्वीटार खात्यावरून ट्वीच करून या दोघांच्या शतकी खेळीचे कौतुक केल. सिचनने लिहिले की, “स्म्रीती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांची शतकी खेळी. त्यांनी फलंदाजी सोपी बनवली आहे.”

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू आणि त्याच्या तुफानी खेळीसाठी एकेकाळी ओळखला जाणाऱ्या युवराज सिंगने (Yuvraj Singh) ट्वीटरवर लिहिले, “चांगले खेळलात मुलींनो. स्म्रीती मंधाना आणि हरमनप्रीत कौरने समजूतदार फटके मारत परिपक्व खेळी केली. शतकासाठी शुभेच्छा.”

दरम्यान, नाफेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यस्तिका भाटिया (३१) आणि स्म्रीती मंधानाने संघाला चांगली सुरुवात दिली. सर्वप्रथम यस्तिकाने विकेट गमावली. त्यानंतर मिताली राजने ५ आणि दीप्ती शर्माने १५ धावा करून स्वस्तात विकेट गमावली. परंतु, नंतर हरमनप्रीत आणि स्म्रीतीचे उत्कृष्ट भागीदारी पार पाडली. विश्वचषक स्पर्धेत हरमनप्रीतने केलेले हे तिसरे शतक आहे आणि अशी कामगिरी करणारी ती एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे.

महत्वाच्या बातम्या –

पाकिस्तानी दर्शकांकडून ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे जोरदार स्वागत, पण तो आला तसाच गेला; पाहा काय झालं?

पीवायसी रिबाउंड रॅकेट लीग २०२२ स्पर्धेत रावेतकर मस्कीटर्सचा सलग दुसरा विजय

आरसीबीला आतापर्यंत लाभलेत ६ कर्णधार, फाफ असेल सातवा; जाणून घ्या आतापर्यंतच्या कॅप्टन्सचे आकडे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---