---Advertisement---

ट्रॉफी मिळवून दिल्यानंतरही..’ उथप्पाचा मोठा खुलासा, यामुळे अय्यरने केकेआरचा संघ सोडला!

On: मंगळवार, मे 27, 2025 9:58 PM
---Advertisement---

श्रेयसच्या नेतृत्वाखाली (shreyas iyer) पंजाब किंग्सला (punjab kings) प्लेऑफपर्यंत (playoff) पोहोचवणाऱ्या कर्णधार श्रेयसचे प्रत्येकाकडून कौतुक होत आहे. त्याच्या नेतृत्वात पहिल्यांदा संघामध्ये ट्रॉफी जिंकण्याच्या आशा जागल्या आहेत. एका बाजूला श्रेयसची इंग्लंड दौऱ्यावर निवड न झाल्याने चर्चा होत आहे. तत्पूर्वी माजी फलंदाज रॉबिन उथप्पाने (Robin uthhppa) खुलासा करत म्हटले आहे की, मागच्या हंगामात त्याच्या कर्णधार पदाखाली केकेआरला ट्रॉफी जिंकून दिल्यानंतरही श्रेयसला तो मान मिळाला नाही, ज्याचा तो हकदार होता आणि याच कारणाने केकेआरला सोडण्याचा त्याने निर्णय घेतला.

केकेआरसाठी (KKR) खेळलेल्या उथप्पाने म्हटले, मागच्या हंगामात श्रेयसला मिळालेल्या वागणुकीमुळे किंवा न दिलेल्या महत्त्वामुळे तो नाराज होता. याच कारणाने त्याने केकेआरचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला. श्रेयस कायमच असामान्य कर्णधार राहिलेला आहे. श्रेयसच्या नेतृत्वात केकेआरने शानदार प्रदर्शन केल्यानंतर देखील श्रेयसला तो सन्मान आणि ते महत्त्व देण्यात आले नाही.

रॉबिन म्हणाला, श्रेयस यानंतर अशा संघात सामील झाला ज्याने, आतापर्यंत तसे बघायला गेल्यास काहीच मिळवले नव्हते. परंतु त्याच्या नेतृत्वात संघाने विजय मिळवत प्लेऑफमध्ये देखील स्थान निश्चित केले. हे त्याचं नेतृत्व आणि स्वतःवरच्या विश्वासाबद्दल खूप काही सांगून जाते. त्याच्या नेतृत्वात संघाने क्वालिफायर 1 मध्ये देखील स्थान निश्चित केले आहे. संघ सध्या पॉईंट्स टेबलवर पहिल्या स्थानी आहे.

माजी फलंदाज (former cricketer) म्हणाला, तुम्ही कोणत्याही स्पर्धेत योग्य वेळेवर चांगल्या फॉर्ममध्ये असावे असे वाटते. तसेच प्लेऑफमध्ये पोहोचताना तुम्हाला प्रेरणेची देखील गरज असते. पंजाबने स्पर्धेत चांगली सुरुवात केली, लीगच्या शेवटी ते त्यांची ही लय गमावताना दिसले. पण प्लेऑफच्या आधी त्यांनी त्यांचा तोच फॉर्म परत मिळवला. उथप्पा म्हणाला, नॅशनल ड्यूटीवर आलेल्या काही खेळाडूंना गमावले आहे. परंतु यानंतर देखील पंजाबची बॅटिंग चांगली दिसत आहे. अर्शदीपने आतापर्यंत त्याच सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं नाही आणि हे पंजाबसाठी चांगला संकेत आहेत. याचा अर्थ असा की, अर्शदीपची सर्वश्रेष्ठ खेळी अजून बाकी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---