आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून (DC) धमाकेदार खेळी करणाऱ्या जॅक फ्रेझर मॅकगर्कला (Jake Fraser-McGurk) ऑस्ट्रेलियानं इंग्लंड आणि स्कॉटलंड दौऱ्यावर स्थान दिलं आहे. तर एकदिवसीय विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्सनं (Pat Cummins) वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत इंग्लंड दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलिया संघ सप्टेंबरमध्ये स्कॉटलंडविरुद्ध 3 टी20 आणि इंग्लंडविरुद्ध 5 एकदिवसीय सामने खेळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सांगितलं आहे की, पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी पाहता पॅट कमिन्स वर्कलोड मॅनेजमेंटमध्ये खेळणार नाही हे आधीच ठरलं होतं. या दौऱ्यांवर मिचेल मार्श (Mitchell Marsh) ऑस्ट्रेलिया संघाची धुरा सांभाळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज जॅक फ्रेझर मॅकगर्कला (Jake Fraser-McGurk) एकदिवसीय आणि टी20 या दोन्ही मालिकेत खेळण्यासाठी स्थान मिळालं आहे. आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या या खेळाडूला 15 सदस्यीय विश्वचषक संघात स्थान मिळालं नव्हतं. परंतू, नंतर त्याचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता.
जॅक फ्रेझर मॅकगर्क (Jake Fraser-McGurk) हा आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात होता. त्यानं दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएलच्या या हंगामात त्यानं दिल्लीकडून 9 सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 36.67च्या सरासरीनं 330 धावा ठोकल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 234.04 राहिला होता. 334 धावांच्या खेळीत त्यानं 4 धमाकेदार अर्धशतकं झळकावली होती. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 84 राहिली होती.
स्काॅटलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जॅक फ्रेझर मॅकगर्क, कॅमरन ग्रीन, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉयनिस, ॲडम झाम्पा
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, जॅक फ्रेझर मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ॲडम झापा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी! “भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी आला नाही तर…”
मेस्सी दुखापतग्रस्त…तरीही हार मानली नाही! अर्जेंटिनानं सलग दुसऱ्यांदा जिंकला कोपा अमेरिकाचा खिताब
स्पेन विक्रमी चौथ्यांदा युरो चॅम्पियन! इंग्लंडचा सलग दुसऱ्या फायनलमध्ये पराभव