मुंबई । क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अनेक खेळाडू प्रशिक्षक अथवा समालोचकाच्या भूमिकेत दिसून येतात तर काही खेळाडू प्रसारमाध्यमात ‘स्पोर्ट्स एक्स्पर्ट’ म्हणून काम करतात. पण प्रत्येक जण प्रशिक्षक अथवा समालोचक बनू शकत नाही. त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी अथवा व्यवसाय करावा लागतो.
न्यूझीलंडमधील बहुतांश क्रिकेटपटू निवृत्तीनंतर नोकरी करताना दिसून आले. इंग्लंडमध्येही असेच एक यष्टिरक्षक आहेत जे आज व्यावसायिक चित्रकार म्हणून काम करत आहेत. जॅक रसेल अस या खेळाडूच नाव आहे.
जॅक रसेल यांनी इंग्लंडकडून दहा वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले. फलंदाज ऐवजी एक यशस्वी यष्टीरक्षक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. त्यांच्या यष्टीरक्षणात चांगलाच हातखंडा होता. त्यांनी इंग्लंडकडून 54 कसोटी सामने खेळताना 1897 धावा केल्या. यात 2 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहेत. तर 40 वनडे सामन्यात 17.62 च्या सरासरीने 423 धावांची नोंद त्याच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 194 झेल तर 18 जणांना यष्टीचीत केले.
यष्टीरक्षक म्हणून गाजवली कारकीर्द
ग्लूस्टरशायर या काउंटी संघाकडून दर्जाचे प्रथम श्रेणीचे 465 आणि अ दर्जाच्या 479 सामन्यात प्रतिनिधित्व केले. त्यांच्या नावावर 23 हजार पेक्षा जास्त धावांची नोंद आहे. या 13 शतकांचा समावेश आहे रचले आपल्या संपूर्ण कारकिर्दीत 1658 झेल घेतले तर जणांना 227 यष्टीचीत केले. जॅक रसेल 2007 साली फॉरेस्ट ग्रीन रोवर्स फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. यासोबतच त्यांनी ग्लूस्टरशर संघाचे मेंटर म्हणूनही काम केले.
क्रिकेटच्या वेळेतही काढायचे पेंटिंग
जॅक रसेल यांनी त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1998 साली खेळला होता. रसेल यांची आज ग्लूस्टरशर येथे चिपिंग सॉडबरी येथे आर्ट गॅलरी आहे जेथे पेंटिंग करण्याचे काम करतात. वूस्टरशर येथे काऊंटी क्रिकेटचा सामना सुरू होता. सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. सर्वच खेळाडू सामना कधी सुरू होईल याची वाट पाहत होते तर रसेल हे बाजारात स्केच पॅड आणि पेन्सिल घेण्यासाठी गेले. त्यानंतर परत आल्यावर गॅलरीत बसून मैदानाचे चित्र काढू लागले.
पाकिस्तानात सुरू झाला चित्रांचा प्रवास
इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱयावर गेला होता. सहा आठवडय़ांच्या दौऱ्यात केवळ दोनच दिवस रसेला खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे तो दररोज पाकिस्तानच्या बाजारात जायचा. तिथे असलेले दृश्य तो रेखाटायचा. पाकिस्तानच्या या दौऱ्यात त्यांनी तब्बल 40 पेंटिंग तयार केल्या आणि ब्रिस्टल येथे पोहचल्यावर त्या चित्रांचे प्रदर्शन भरवले. ही सारी चित्रे अवघ्या दोनच दिवसांत विकली गेली.