---Advertisement---

आपल्या देशासाठी जखम झालेलं स्वत:चं बोट कापायलाही तयार झालेला क्रिकेटर

On: शुक्रवार, जुलै 31, 2020 8:02 AM
---Advertisement---

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू जेकब ओरमने काल(२८ जुलै) आपला ४२ वा वाढदिवस साजरा केला आहे. ज्याप्रमाणे धोनी शाळेत असताना फुटबॉल संघाचा गोलकीपर असायचा, त्याचप्रकारे ओरम देखील आपल्या शाळेसाठी गोलकीपिंग करत. परंतु, नंतर त्याने क्रिकेटमध्ये आपले करिअर केले आणि त्यात त्याला यश आले. आपल्या अष्टपैलू कामगिरीने अनेक वेळा न्यूझीलंड संघाला जिंकविण्यात त्याचा मोलाचा वाटा राहिला आहे.

१९७८ मध्ये न्यूझीलंडच्या मनावतु येथे जन्मलेल्या, ६ फूट ६ इंच उंची लाभलेला हा खेळाडू मध्यमगती गोलंदाजी तसेच खालच्या क्रमांकावर येऊन आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात.

जानेवारी २००१ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण करून त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचा जयगणेशा केला. पण, २००१-२००२ हंगामात पायाच्या दुखापतीमुळेमुळे ओरमला बाहेर रहावे लागले, परंतु २००२-२००३ मध्ये त्याने पुनरागमन केले आणि कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात आपले स्थान निश्चित केले.

२००७ विश्वचषकाआधी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या चॅपल-हॅडली वनडे मालिकेदरम्यान, जेकब ओरमच्या डाव्या हाताचे बोट जखमी झाले. दुखापतीमुळे ओरमची आगामी विश्वचषकासाठी न्युझीलँड संघात निवड होण्यावर साशंकता निर्माण झाली होती. त्यावर ओरम म्हणालेला, गरज पडल्यास विश्वचषक खेळण्यासाठी तो आपले बोट कापण्यास तयार आहे.

ओरमने १२ डिसेंबर २००२ रोजी भारताविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्याने शेवटची कसोटी श्रीलंकेविरुद्ध २००९ मध्ये खेळली. सात वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत ओरामने एकूण ३३ कसोटी सामने खेळले आणि ५ शतके आणि ६ अर्धशतकांच्या मदतीने १७८० धावा केल्या. या दरम्यान, त्याची सर्वोत्तम धावसंख्या १३३ धावा होती. गोलंदाजीत त्याने एकूण ६० गडी बाद केले. कसोटी सामन्यात त्याची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी ६३ धावांत ६ बळी अशी होती.

जेकब ओरम २००६-२००७ सीबी सिरीज मालिकेत अभूतपूर्व कामगिरी करण्यात यशस्वी झाला. या मालिकेत त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. एकदिवसीय सामन्यात ओरामचे पहिले शतक याच मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आले. त्याने ७२ चेंडूंत आक्रमक १०१ धावा केल्या होत्या.

दुखापतीमुळे ओरमला २००९ मध्ये कसोटीतून निवृत्ती घ्यावी लागली. मात्र त्याने वनडे आणि टी२० मध्ये खेळणे सुरूच ठेवले. ओरम आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्स या संघांकडून खेळला. लॉर्ड्स मैदानावर कसोटी शतक फटकावल्याने त्याचे नाव ऑनर्स बोर्डवर देखील झळकले आहे. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात हॅट्रिकची नोंद आहे.

ओरमने न्युझीलँडसाठी १६० वनडे खेळताना २,४३४ धावा तर १७३ बळी मिळवले. टी२० मध्ये देखील त्याची कामगिरी शानदार राहिली. त्याने ३६ टी२० सामन्यात सहभागी होत ४७४ धावांसह १९ बळी घेतले.

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल इतिहासातील ५ सर्वोच्च वैयक्तिक खेळी; २ खेळाडूंनी तर दोनदा केलाय हा पराक्रम

४०० पेक्षा जास्त टी२० सामने खेळणारे ३ खेळाडू; तिघेही आहेत एकाच संघातील

खलनायक ते नायक!

महत्त्वाच्या बातम्या – 

ज्या युवराजने ब्रॉडला ६ षटकार ठोकले, तोच युवराज आज ब्रॉडला म्हणतोय…

आयसीसी वनडे क्रमवारीत विराट कोहली अव्वल स्थानावर, तर रोहित आहे ‘या’ क्रमांकावर

आयपीएल २०२०चे वेळापत्रक बीसीसीआयने केले तयार; आता प्रतिक्षा फक्त संघांच्या मंजूरीची…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---