---Advertisement---

ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिस बनला इंग्लंड संघाचा फलंदाजी सल्लागार

---Advertisement---

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आगामी श्रीलंका दौऱ्याआधी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस याला इंग्लड क्रिकेट संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. इंग्लंड क्रिकेटने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची घोषणा केली. इंग्लंडचा संघ नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

ट्विट करत दिली माहिती
इंग्लड क्रिकेटने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आगामी श्रीलंका दौऱ्यासाठीच्या प्रशिक्षकांची घोषणा केली. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस याला फलंदाजी सल्लागार म्हणून स्थान देण्यात आले आहे. ख्रिस सिल्व्हरवूड हे संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. सहाय्यक प्रशिक्षक आणि यष्टीरक्षक सल्लागार म्हणून इंग्लंडचे माजी खेळाडू पॉल कॉलिंगवूड व जेम्स फोस्टर हे काम पाहतील. तर, फिरकी गोलंदाजी सल्लागाराची जबाबदारी न्यूझीलंडचा माजी खेळाडू जितन पटेल याच्यावर टाकली आहे.

जॅक कॅलिसने आपल्या कारकीर्दीत भारतीय उपखंडात नेहमी चमकदार कामगिरी केली होती. सोबतच, त्याला प्रशिक्षणाचा पुरेसा अनुभव आहे. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पाच वर्ष प्रशिक्षक होता.

इंग्लड करणार आहे श्रीलंकेचा दौरा
मार्च २०२० मध्ये इंग्लंड संघ श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार होता. मात्र, कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने इंग्लंड संघ श्रीलंकेतून एकही सामना न खेळता माघारी परतलेला. आता हेच सामने पुढील वर्षी जानेवारी महिन्यात १४ जानेवारीपासून खेळवले जातील. दोन्ही सामने हंबनटोटा येथे जैव- प्रतिबंधक वातावरणात खेळवले जाणार आहेत. या दौऱ्यानंतर, इंग्लंडचा संघ भारतात ४ कसोटी सामने खेळेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अनुषंगाने या मालिकेला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अफगाणिस्तान क्रिकेटसाठी खुशखबर; ‘या’ ठिकाणी बनणार नवे स्टेडियम

भारताला कोहली आणि पुजाराचे अपयश भोवले, ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाजचे मत

“विहारीला वरच्या फळीत संधी मिळावी, तर राहुलला…,” माजी भारतीय क्रिकेटरने मांडले मत  

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---