कोलकाता नाईट रायडर्सनं मेंटॉर गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल 2024 चं विजेतेपद पटकावलं. संघान फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून जेतेपदाचा 10 वर्षांचा दुष्काळ संपवला.
केकेआरला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर गौतम गंभीर आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. एवढंच नाही, तर त्यानं केकेआरच्या सपोर्ट स्टाफमधील अभिषेक नायर आणि रायन टेन डोशेटे यांनाही भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून आपल्यासोबत घेतलं. त्यामुळे आता केकेआरमध्ये मेंटॉरपद रिकामं आहे.
गंभीर गेल्यानंतर कोलकातानं आता त्याच्या जागी नव्या व्यक्तीच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. हा व्यक्ती मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांना मदत करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्रँचायझी संघाचा माजी खेळाडू जॅक कॅलिस याला मेंटर म्हणून नियुक्त करू इच्छित आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, कॅलिस यापूर्वीही कोचिंग स्टाफचा भाग होता. 2015 मध्ये त्यानं मुख्य प्रशिक्षक आणि फलंदाजी सल्लागार म्हणून काम केलं होतं. विशेष म्हणजे, कॅलिस केकेआरमध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. संघानं जेव्हा 2012 आणि 2014 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं, तेव्हा कॅलिस संघाचा सदस्य होता.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, कोलकाताला गंभीरच्या जागी रिकी पाँटिंग किंवा कुमार संगकारा यांची नियुक्ती करायची आहे. पॉन्टिंगनं आयपीएल 2024 नंतर दिल्ली कॅपिटल्सचं मुख्य प्रशिक्षकपद सोडलं. तर दुसरीकडे संगकारा सध्या राजस्थान रॉयल्समध्ये क्रिकेटचा संचालक आहे.
टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची नुकतीच राजस्थान रॉयल्सचे हेड कोच म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे संगकारा राजस्थान रॉयल्समध्येच राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जॅक कॅलिस कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर बनू शकतो, असं बोललं जातंय.
हेही वाचा –
ऋतुराज-अय्यरला वगळलं, पण या तिघांना संधी कशी मिळाली? संघ निवडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियासोबत दिसणार जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज, गंभीरशी खास नातं
‘अतिशय शक्तिशाली…’, राहुल द्रविडचे भारतीय क्रिकेटबाबत मोठे विधान