इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजा याने भारतासाठी महत्वपूर्ण धावा केल्या. उभय संघांतील पाच सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा सामना आहे. गुरुवारी राजकोटमध्ये सुरू झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी सुरुवातीच्या तीन विकेट्स भारताने स्वस्तात गमावल्या. पण नंतर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांच्यात मोठी भागीदारी झाली. शतकी खेळीनंतर अष्टपैलूने जडेजाने आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला.
भारतासाठी या सामन्यात सलावमीर यशस्वी जयस्वाल 10, शुबमन गिल 0 आणि रजत पाटीदार याने 5 धावांची खेळी केली. संघाची धावसंख्या 33 असताना सुरुवातीच्या या तिन्ही विकेट्स भारताने गमावल्या. पण चौथ्या विकेटसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यात द्विशतकी भागीदारी झाली. रोहित 196 चेंडूत 131 धावांची खेळी केली. तर पहिल्या दिवसाखेर जडेजा 110* धावांसह खेळपट्टीवर कायम राहिला. शतकी खेळी केल्यानंतर जडेजाने गुरुवारी कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या 3000 धावाही पूर्ण केल्या.
इंग्लंडविरुद्ध अप्रतिम फलंदाजी करणारा जडेजा आपल्या फिरकीच्या जाल्यात आजपर्यंत जगभरातील फलंदाजांना अडकवत आला आहे. याच पार्श्वभूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या रुपात 3000 धावा आणि गोलंदाजाच्या रुपात 200 विकेट्स पूर्ण करणारा जडेजा केवळ तिसरा भारतीय क्रिकेटपटू बनला. याआधी ही कामगिरी माजी कर्णधार कपिल देव आणि रविचंद्रन अश्विन यांनीच केली होती.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी 3000 धावा करून 200 विकेट्स घेणारे खेळाडू
कपिल देव – 5248 धावा आणि 434 विकेट्स
रविचंद्रन अश्विन – 3271 धावा आणि 499 विकेट्स
रविंद्र जडेजा – 3003 धावा आणि 280 विकेट्स
Centuries from Jadeja (110*) and Rohit Sharma (131) guide #TeamIndia to 326/5 at Stumps on Day 1 of the 3rd Test.
Scorecard – https://t.co/eYpzVPnUf8 #INDvENG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/KVSDlNKmQG
— BCCI (@BCCI) February 15, 2024
दरम्यान, भारताने पहिल्या दिवसाखेर 5 विकेट्सच्या नुकसानावर 326 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडसाठी मार्क वुड याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर जॉम हार्टली यालाही एक विकेट मिळाली. दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजा याच्या साथीने कुलदीप यादव (1*) भारतासाठी दिवसाची सुरुवात करेल. (Jadeja also did what only two Indians have managed till now, the century in the Rajkot Test was special)
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
महत्वाच्या बातम्या –
Rajkot Test । ज्याने धावबाद केले, सरफराजकडून त्याचाचे झाले कौतुक, पाहा पदार्पणवीर काय म्हणाला
IND vs ENG । सरफराजला धावबाद केल्यामुळे जडेजावर संतापला रोहित? लाईव्ह सामन्यातील दोघांमध्ये राडा