---Advertisement---

विरूला सलामीच्या जागी खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले असते का? रोहितच्या ‘त्या’ निर्णयावर भडकला जडेजा

On: रविवार, एप्रिल 25, 2021 12:41 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत ५ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला या हंगामात साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. गेल्या काही सामन्यातील कामगिरी पाहता या संघाला १५० धावा उभारण्यात देखील अपयश येत आहे. शुक्रवारी (२३ एप्रिल ) झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने मुंबई इंडियन्स संघावर ९ गडी राखून विजय मिळवला होता. या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या फलंदाजी क्रमाबद्दल सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा आणि वीरेंद्र सेहवाग यांनी देखील टीका केल्याचे दिसून आले आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात, पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई संघातील फलंदाजांनी पावरप्लेच्या षटकात कमी धावा केल्या होत्या. यासोबतच रोहित शर्माने, तिसऱ्या क्रमांकावर इशान किशनला फलंदाजी करण्यासाठी बोलवले होते. तसेच फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. यावरून माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजाने संताप व्यक्त केला होता.

जडेजाने म्हटले की, “मागील काही सामन्यांची कामगिरी पाहता असे दिसून येत होते की, मुंबई संघ चांगली कामगिरी करत आहे. तेव्हाही या संघाला कमीत कमी १५० धावा करण्यात यश येत होते. परंतु आता संघाने पंजाबविरुद्ध अवघ्या १३० धावा केल्या आहेत. हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. तुम्ही खराब खेळ करू शकता. लवकर बाद होऊ शकता. परंतु या सामन्यामध्ये मुंबई संघ आक्रमक दिसून आला नव्हता. ही मुंबई संघाची ओळख नाहीये.

सेहवागला खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगितले असते का?
तसेच तो पुढे म्हणाला की, “जर तुमचे पावरप्लेच्या षटकात २, ३ गडी बाद झाले असतील तर समजू शकतो. पण या सामन्यात असे काहीच झाले नव्हते. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवला तुम्ही वरच्या फळीत फलंदाजी करण्यासाठी पाठवले नव्हते. तुम्हीच सांगा, तुम्ही वीरेंद्र सेहवागला म्हणाल का, तू सलामी फलंदाजी सोडून खालच्या क्रमांकावर फलंदाजी कर?”

सूर्यकुमार यादवला वरच्या क्रमांकावर फलंदाजी पाठवणे योग्य ठरले असते.
तसेच विरेंद्र सेहवाग म्हणाला की, “सूर्यकुमार यादव ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे. ते पाहता त्याने अर्धशतक झळकावले असते किंवा पावरप्लेच्या षटकांमध्ये अधिक धावा केल्या असत्या. तो लवकर बाद झाला असता परंतु तुम्हाला विश्वास ठेवणे खूप गरजेचे आहे. तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर अशा फलंदाजाला फलंदाजी करण्यासाठी पाठवले, ज्याने गेल्या ४ सामन्यांपासून निराशाजनक कामगिरी केली आहे. तसेच तुम्ही अशा फलंदाजाला मागे ठेवले ज्याने गेल्या ४ सामन्यामध्ये २,३ सामन्यात चांगली खेळी केली आहे. जर एकापाठोपाठ एक २,३ गडी बाद झाले तर चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांवर ही प्रेशर येतो. सुर्यकुमार यादवला पावरप्लेच्या षटकांमध्ये फलंदाजी करण्यासाठी पाठवणे योग्य ठरले असते.”

महत्त्वाच्या बातम्या-

सूर्या-इशानला तंबूत धाडणाऱ्या गोलंदाजाला सुरुवातीच्या सामन्यात का मिळाली नाही संधी? कोच कुंबळेंनी दिले उत्तर

टीम इंडियाला शोधावा लागणार नवा फिनिशर? दिनेश कार्तिकच्या खराब आकडेवारीने वाढली संघाची काळजी

‘बुमराह चांगला गोलंदाज आहे, पण सिराज बुमराहपेक्षाही उत्कृष्ट,’ भारतीय दिग्गजाचं मोठं भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---