---Advertisement---

टीम इंडियाला शोधावा लागणार नवा फिनिशर? दिनेश कार्तिकच्या खराब आकडेवारीने वाढली संघाची काळजी

On: रविवार, एप्रिल 25, 2021 11:19 AM
---Advertisement---

‘विश्वचषक’… क्रिकेटविश्वातील प्रत्येक संघाच्या आणि क्रिकेटपटूच्या डोळ्यांतील स्वप्न. मग तो वनडे असो वा टी२० विश्वचषक. क्रिकेटपटू वर्षभरआधीच विश्वचषकाच्या तयारीला लागतात. २०२१ च्या मावळतीला अर्थात ऑक्टोबर महिन्यात आयसीसी टी२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. हा विश्वचषक भारतात खेळवण्यात येणार असल्याने दुसरा टी२० विश्वचषक पटाकवण्याची भारतीय संघाला सुवर्णसंधी असणार आहे.

सध्या वेगवेगळ्या शहरात चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ द्वारे भारतीयांसह इतर क्रिकेटपटूही या विश्वचषकाची जोमाने तयारी करत आहेत. परंतु या विश्वचषकात भारतीय टी२० संघाचा फिनिशर म्हणून पाहिले जात असणारा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक दिवसेंदिवस निराशाजनक प्रदर्शन करताना दिसत आहे. यामुळे भारतीय संघाच्या काळजीत वाढ झाली आहे.

शनिवार रोजी (२४ एप्रिल) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२१ चा अठरावा सामना झाला. या सामन्यात राजस्थानचा खेळाडू ख्रिस मॉरिसने पैसावसूल प्रदर्शन केले. ४ षटकात अवघ्या २३ धावा देत त्याने कोलकाताच्या ४ फलंदाजांना तंबूत धाडले. त्याच्या विकेट्समध्ये दिनेश कार्तिकच्या विकेटचाही समावेश होता.

हा तोच दिनेश कार्तिक आहे, ज्याला भारतीय टी२० विश्वचषक संघातील फिनिशरच्या भूमिकेत पाहिले जात आहे. स्वत: दिनेश कार्तिकने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची सुरुवात होण्यापुर्वी येत्या टी२० विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबरोबरच आयपीएलमध्ये सामन्याचा यशस्वी शेवट करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरुन भारतीय टी२० संघात फिनिशरच्या रुपात स्थान निश्चित करु शकेल, असेही त्याने सांगितले होते. 

परंतु दिनेश कार्तिकची आतापर्यंतची आयपीएल २०२१ मधील आकडेवारी अतिशय वाईट राहिली आहे. सामन्याचा शेवट करणे दूर, तो कोलकाता संघासाठी धावा बनवण्यातही संघर्ष करताना दिसत आहे. राजस्थान विरुद्ध कोलकाता सामन्याचे ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर, संघ ५ बाद ९५ धावा अशा स्थितीत असताना त्याने अतिशय महागडी फलंदाजी केली. २४ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार मारत त्याने फक्त २५ धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १०४.१७ इतका होता, जो एका फिनिशरसाठी साजेसा नाही.

एवढेच नव्हे तर, आतापर्यंतच्या ५ सामन्यात संधी मिळूनही तो फक्त ९७ धावा करु शकला आहे. दरम्यान त्याला एकही अर्धशतक करता आलेले नाही. अशात जर त्याने आगामी आयपीएल सामन्यात चमत्कारिक खेळी केल्या नाहीत, तर टी२० विश्वचषक २०२१ मध्ये खेळण्याचे त्याचे स्वप्न स्वप्नचं बनून राहिल!

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित-मॉर्गनला १२ लाखांचा दंड झाल्याने इंग्लिश दिग्गज भलताच खुश; म्हणे, ‘खेल से खिलवाड नहीं’

‘तुला साराची शप्पथ चांगला खेळ’, सचिनचा Rumoured जावई फलंदाजीत सपशेल फ्लॉप; सारा झाली ट्रोल

‘बुमराह चांगला गोलंदाज आहे, पण सिराज बुमराहपेक्षाही उत्कृष्ट,’ भारतीय दिग्गजाचं मोठं भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---