---Advertisement---

रोहित-मॉर्गनला १२ लाखांचा दंड झाल्याने इंग्लिश दिग्गज भलताच खुश; म्हणे, ‘खेल से खिलवाड नहीं’

On: रविवार, एप्रिल 25, 2021 10:56 AM
---Advertisement---

टी-२० क्रिकेट, हे क्रिकेटमधील सर्वात छोटे प्रारूप आहे .२० षटकांच्या या खेळात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला जातो. तसेच अनेक मोठमोठे विक्रम देखील केले जातात. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा सुरू झाल्यापासून या खेळाला वेगळीच ओळख मिळाली आहे. याद्वारे खेळासह क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजनदेखील होत असते. परंतु या स्पर्धेतही काही बंधने घालण्यात आली आहेत, ज्यांचे उल्लंघन केल्यास खेळाडूंवर दंड आकारला जातो. यात षटकांची गती कमी ठेवल्यामुळे संबंधित संघाच्या कर्णधाराला होणाऱ्या दंडाचाही समावेश आहे.

अशातच षटकांची गती कमी राखल्यामुळे (स्लो ओवर रेट) दंड आकारण्यात आलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि ऑयन मॉर्गनबद्दल माजी इंग्लिश कर्णधार केविन पीटरसनने मोठे वक्तव्य केले आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धेत आतापर्यंत १८ सामने खेळवले गेले आहेत. आतापर्यंत मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा, कोलकाता नाईट रायडर्सचा ओएन मॉर्गन आणि चेन्नई सुपर किंग्जचा एमएस धोनी या कर्णधारांवर यांच्यावर स्लो ओवर रेटमुळे दंड आकारण्यात आला आहे. याबाबत माजी इंग्लिश कर्णधार केविन पीटरसनने मोठे वक्तव्य केले आहे.

केविन पीटरसनने ‘बेटवे डॉट कॉम’ या सांकेतिक स्थळावर एक लेख लिहिला होता, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, ‘हा खेळाडूंसाठी एक महान संदेश आहे की, रोहित शर्मा आणि ओएन मॉर्गन या खेळाडूंवर या आठवड्यात स्लो ओवर रेटमुळे दंड आकारण्यात आला. टी-२० क्रिकेट संपूर्ण मनोरंजनाने भरलेला पॅकेज आहे. यामध्ये तुम्हाला चौकार, षटकार, बाद होण्यात आणि क्षेत्ररक्षण करताना होणाऱ्या चुकांमध्ये माफी मिळेल. परंतु तुम्ही सामन्यात उशीर करू शकत नाही.’

‘चाहत्यांनाही हे सर्व ३ तासातच हवं असतं. मला अजूनही आठवण आहे की, जेव्हा मी २००४ मध्ये पहिल्यांदा टी-२० क्रिकेट खेळलो होतो. तेव्हा धावफलकावर टायमर लावण्यात आला होता. त्यावेळी षटक हे वेळेतच पूर्ण करायचे होते. यात कोणतीही तडजोड होऊ शकली नाही,” असे त्याने पुढे लिहिले.

आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मावर दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात स्लो ओवर रेटमुळे १२ लाखांचा दंड आकारण्यात आला होता. तसेच कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार ओएन मॉर्गनवर देखील चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात स्लो ओवर रेटमुळे १२ लाखांचा दंड आकारण्यात आला होता. यासोबतच कॅप्टनकूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएस धोनीला देखील स्लो ओवर रेटचा फटका बसला होता. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात स्लो ओवर रेटमुळे कर्णधार धोनीवर १२ लाखांचा दंड आकारण्यात आला होता.

प्रत्येक संघाला आपले २० षटक पूर्ण करण्यासाठी ९० मिनिटांचा अवधी दिला जातो. यापेक्षा अधिक वेळ लागल्यास कर्णधारावर १२ लाखांचा दंड आकारण्यात येतो. ही चूक जर पुन्हा झाली, तर दंडाची रक्कम दुप्पट होते. एवढेच नव्हे तर, तिसऱ्यांदा अशी चूक केल्यास कर्णधारावर एका सामन्याची बंदीही घातली जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘बुमराह चांगला गोलंदाज आहे, पण सिराज बुमराहपेक्षाही उत्कृष्ट,’ भारतीय दिग्गजाचं मोठं भाष्य

केकेआरचा पराभवाचा ‘चौकार’, कर्णधार मॉर्गनने व्यक्त केली निराशा; सांगितली कुठे झाली चूक

दु:खद! कोरोनामुळे ‘या’ भारतीय महिला क्रिकेटपटूच्या आईचे निधन, बहिणही संक्रमित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---