मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी (२४ एप्रिल) पार पडलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात राजस्थान संघाने जोरदार पुनरागमन करत ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात राजस्थान संघाच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. दुसरीकडे कोलकाता संघाचे फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले होते. त्यातही हंगामाच्या सुरुवातीपासून सतत फ्लॉप ठरत असलेल्या शुबमन गिलमुळे आता सारा तेंडुलकर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्यात नातेसंबंध असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. अशात आयपीएल २०२१ स्पर्धेत गिलला संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयश येत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यात अवघ्या ८० धावा केल्या आहेत. तसेच राजस्थान संघाविरुद्ध खेळताना देखील तो १९ चेंडूत ११ धावांची खेळी करत माघारी परतला होता.
या धिम्या खेळीमुळे त्याला तर ट्रोल केले जात आहे. यासोबतच माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी साराबद्दलही अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एका युजरने गिल आणि साराबद्दल मिम्स शेअर केला आहे, ज्यामध्ये ‘फिर हेरा फेरी’ चित्रपटातील परेश रावल यांचा प्रसिद्ध डायलॉग, ‘क्या गुंडा बनेगा रे तू?’चा वापर केला गेला आहे. यामध्ये परेश रावल यांच्याजागी साराचा फोटो लावला गेला आहे. तसेच या फोटोवर, ‘क्या मेरा पती बनेगा रे तू?’ असे लिहिण्यात आले आहे.
Gill failed to score big on Sachin's birthday
Sara Tendulkar : pic.twitter.com/WGy9Sto8ra
— Priyanshu (@cricketwalaldka) April 24, 2021
तसेच दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘साराला आता मोठा प्रश्न पडला असेल. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त जल्लोष साजरा करू की, गिलच्या अपयशावर दुःखी होऊ’, आणि पुढे हसण्याच्या ईमोजी टाकण्यात आले आहे.
Sara confused h papa k bday pr khush hu k Gill ki nakami pr dukhi ????????
— Rohit Bector (@rohit_bector) April 24, 2021
https://twitter.com/The_Lost_Poet_/status/1385964221700087808?s=20
Dear Sara, please block Shubhman Gill on every social media app.
— Right Arm Over (@RightArmOver_) April 24, 2021
Gill tujhe sara ki Kasam fast khel le
— S???? (@SrishtyHere) April 24, 2021
https://twitter.com/AnilGaikwad_/status/1385959289244717062?s=20
Shubham Gill After His Performance In #ipl2021 ???? pic.twitter.com/GBEHm8kcRx
— Himanshu Chourasia ???????????? (@Rain_Man25) April 24, 2021
https://twitter.com/Vaibhavkav/status/1385965482159734785?s=20
https://twitter.com/ComeToGabbaMate/status/1385963896243068932?s=20
तसेच अनेकांनी ट्विट करत असेही म्हटले आहे की, सारा तेंडुलकरसाठी शुबमन गिल योग्य नाहीये. येणाऱ्या सामन्यांमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
केकेआरचा पराभवाचा ‘चौकार’, कर्णधार मॉर्गनने व्यक्त केली निराशा; सांगितली कुठे झाली चूक
दु:खद! कोरोनामुळे ‘या’ भारतीय महिला क्रिकेटपटूच्या आईचे निधन, बहिणही संक्रमित
कमिन्सचा जोरदार बाउन्सर आदळला बटलरच्या हेल्मेटवर, थांबवावा लागला सामना; पाहा तो क्षण






