आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात शनिवार (24 एप्रिल) रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानने कोलकातावर सहा गडी राखून विजय मिळवला. परंतु या सामन्यात राजस्थानच्या डावाच्या वेळी एक दुखापती घटना घडली. राजस्थानच्या डावादरम्यान कोलकाता संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने टाकलेला चेंडू राजस्थान संघातील सलामीवीर जोस बटलरला लागल्यामुळे तो जखमी झाला. सुदैवाने त्याची दुखापत जास्त गंभीर नव्हती, परंतु सामना सुमारे 10 मिनिटे थांबवावा लागला.
झाले असे की, या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर बटलर फलंदाजी करत असताना गोलंदाजी करत असलेल्या कोलकाताच्या कमिन्सचा 132 प्रति किमी वेगाचा चेंडू बटलरच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. त्यामुळे बटलरच्या जबड्यात थोड्याफार वेदना जाणवल्या. त्यानंतर लगेच राजस्थानची वैद्यकीय टीम मैदानात दाखल झाली आणि जेव्हा बटलरचे हेल्मेट काढले तेव्हा त्याचा जबड्याला जबरा मार बसल्याचे दिसून आले. तो जबड्याला हात लावून त्रास होत असल्याचे सांगत होता.
त्यानंतर मैदानात आलेल्या वैद्यकीस टीमने त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. त्याचे तोंड उघडले नंतर त्याला पाणी पिण्यास दिले. काही मिनिटांची विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी बटलरला सामना खेळण्यास सहमती दर्शवली. त्यावेळेस खेळण्यासाठी बटलरला दुसरे हेल्मेट देण्यात आले होते. परंतु तो जास्त वेळ खेळू शकला नाही. अवघ्या पाच धावा करून ३.२ षटकात तो तंबूत परतला.
Ouch!! That must've hurt!
Jos Buttler plays one early and the bouncer from Pat Cummins hits the helmet!#IPL2021 #RR #KKR #RRvKKR #RRvsKKR #HallaBol #KKRHaiTayyar #Morgan #RajasthanRoyals #KolkataKnightRiders #Gill #Morrispic.twitter.com/JgGOeEs8wN
— OneCricket (@OneCricketApp) April 24, 2021
That looked like a nasty blow by @patcummins30 to @josbuttler off a furious bouncer. Although, he looks fine and will continue to chase. #IPL2021 #KKRvRR pic.twitter.com/M8Mv8tKJTY
— Nishant (@perhapsnish) April 24, 2021
Ouch
A Pat Cummins bouncer has struck Buttler on the side of the helmet. The physio is out and it has been decided that Buttler will continue to bat.
???? https://t.co/oKLdD2Pi9R #VIVOIPL #RRvKKR pic.twitter.com/cHYwqhhhfO
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2021
असे असले तरीही, बटलरची दुखापत जास्त गंभीर नसावी अशी अपेक्षा केली जात आहे. कारण राजस्थानच्या संघातील जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स या खेळाडूंनी दुखापतीमुळे पूर्ण हंगामातून माघार घेतली आहे. तर लियाम लिव्हिंगस्टोनही बायो बबलला कंटाळून स्वदेशी परतला आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ यंदाच्या मोसमात अडचणीत असून बटलरची दुखापत जर मोठी असेल तर संघाच्या अडचणीत अजून भर पडू शकते.
या सामन्याबाबत सांगायचे झाले तर, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करीता उतरलेल्या कोलकता संघाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याने या संघाने निर्धारित 20 षटकांत नऊ गडी गमावत 133 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान संघाने 18.5 षटकांत 4 गडी गमावून 134 धावा केल्या आणि यंदाच्या मोसमातील दुसरा विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘चेन्नईची खेळपट्टी बकवास’, राजस्थानच्या खेळाडूने उघडपणे व्यक्त केली नाराजी






