---Advertisement---

हुश्श! संपला जडेजाचा बळींचा दुष्काळ, ४० गडी बाद झाल्यानंतर…

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 6:51 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान हेडिंग्ले येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जातोय. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असून इंग्लंडने पहिल्या सत्राअंती दोन्ही सलामीवीर गमावले आहेत. यामध्ये फिरकीपटू रवींद्र जडेजाने इंग्लंडचा सलामीवीर हसिब हमीदला त्रिफळाचीत करत मालिकेतली आपला पहिला बळी मिळविला. यासोबतच त्याने मालिकेतील बळी मिळवण्याचा आपला दुष्काळ संपविला.

जडेजाने केले हमिदला त्रिफळाचित
रॉरी बर्न्सला बाद करून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने भारताला सामन्यातील पहिले यश मिळवून दिले. दुसऱ्या बाजूने त्याचा साथीदार हसिब हमीद धीरोदात्तपणे फलंदाजी करत होता. खेळपट्टी काहीशी कोरडी झाल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या डावातील ६३ वे षटक अष्टपैलू फिरकीपटू रवींद्र जडेजाला दिले. त्याने कर्णधाराला निराश न करता षटकातील अखेरच्या चेंडूवर हमीदला त्रिफळाचित केले. हमीदने १९८ चेंडूत ६८ धावा बनविल्या.

जडेजाने तोडली अपयशाची मालिका
हमीदला बाद करताना जडेजाने मालिकेतील तिसरा सामना करताना आपला पहिला बळी मिळविला. भारतासाठी फिरकीपटूने या मालिकेत घेतलेला हा पहिला बळी होता. त्याच्यापूर्वी भारताच्या पाच वेगवान गोलंदाजांनी या मालिकेत ४० बळी मिळवले आहेत. जसप्रीत बुमराहने १२, इशांत शर्माने ५, मोहम्मद शमीने ८, मोहम्मद सिराजने ११, व शार्दुल ठाकूरने ४ बळी मिळवले आहेत. यापूर्वी फिरकीपटूने पहिला बळी घेण्यासाठी भारतीय संघाला सर्वाधिक वाट १९८९-१९९० मधील पाकिस्तान मालिकेत पहावी लागली होती. त्यावेळी वेगवान गोलंदाजांनी २५ बळी घेतल्यानंतर सचिन तेंडुलकरने फिरकीपटू म्हणून २६ वा बळी मिळविला होता.

दुसऱ्या दिवशी भारताचे पुनरागमन
पहिल्या दिवसावर पूर्णपणे इंग्लंडने वर्चस्व गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने पहिल्या सत्रात पुनरागमन केले. शमीने बर्न्स तर जडेजाने हमीदला त्रिफळाचीत करत इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. इंग्लंडने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात २६ षटके खेळून काढत केवळ ६२ धावा बनवल्या. इंग्लंडकडे सध्या १०४ धावांची आघाडी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘विराट-रोहितमध्ये जिंकण्याची जिद्दच दिसली नाही,’ माजी पाकिस्तानी कर्णधाराची बोचरी टीका

वयाच्या चाळिशीत असूनही अँडरसनपुढे फलंदाजांच्या होतायत बत्त्या गुल, ‘हे’ आहे त्याच्या गोलंदाजीचे रहस्य

https://mahasports.in/ravindra-jadeja-took-wicket-of-haseeb-hameed-on-68-runs/

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---