इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे बाधीत झाला. पहिल्या दिवशी भारताने ७ विकेट्सच्या नुकसानावर ३३८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी तिथपासून पुढे खेळ सुरू झाला. भारताचा दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजाने दुसऱ्या दिवशी त्याचे वैयक्तिक शतक पूर्ण केले, तर जसप्रीत बुमराहनेही बॅटसह महत्वाचे योगदान दिले.
इंग्लंडविरुद्ध सध्या सुरू असेलल्या कसोटी सामना बर्मिंघममध्ये खेळला जात आहे. पहिल्या दिवशी रिषभ पंत (१११ चेंडूत १४६ धावा) आणि रवींद्र जडेजा (८३*) यांनी द्विशतकी भागीदारी केली आणि संघाला अपेक्षात धावसंख्येपर्यंत पोहोचवले. या दोघांमध्ये एकूण २२२ धावांसाठी भागीदारी झाली. पंत बाद झाला पण जडेजा मात्र खेळपट्टीवर कायम होता. दुसऱ्या दिवशी त्याने १८३ चेंडूत स्वतःचे शतक पूर्ण केले. पहिल्या डावात रवींद्र जडेजा जडेजा (Ravindra Jadeja) एकूण १९४ चेंडू खेळला आणि यामध्ये १३ चौकारांच्या मदतीने १०४ धावांचे योगदान दिले.
रोहित शर्मा या सामन्यासाठी अनुपस्थिती असल्यामुळे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या भेदक गोलंगादाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुमराहने या सामन्यात फलंदाजीत देखील महत्याचे योगदान दिले. अवघ्या १६ चेंडूत त्याने ३१ धावा केल्या आणि शेवटपर्यंत नाबाद देखील राहिला. स्टुअर्ट ब्रॉडने टाकेलल्या ८४ व्या षठकात बुमराहने २ षटकार आणि ४ चौकार मारले. वाईट आणि नो बॉलच्या धावा पकडल्या तर भारताला ब्रॉडने टाकलेल्या या षटकात एकूण ३५ धावा मिळाल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरले.
स्टुअर्ट ब्रॉडला सामन्याच्या पहिल्या दिवशी एकही विकेट मिळाली नव्हती, पण दुसऱ्या दिवशी त्याने मोहम्मद शमीला बाद केले. ब्रॉडने पहिल्या डावात ८९ धावा खर्च करून फक्त एक विकेट घेतली. परंतु त्यांचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन नेहमीप्रमाणे या सामन्यातही भारतावर भारी पडला. अँडरसनने पहिल्या दिवशी तीन विकेट्स घेतल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशीही त्याने दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने एकूण ६० धावा खर्च करून सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ जेव्हा फलंदाजीसाठी आला, तेव्हा सुमारे तीन षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला. तोपर्यंत त्यांच्या एलेक्स लीस आणि जॅक क्रोली या दोन्ही सलामीवारांच्या विकेट्स गेल्या होत्या. खेळ जेव्हा पुन्हा एकदा सुरू झाला, तेव्हा ओली पॉप आणि माजी कर्णधार जो रुट खेळपट्टीवर होते. या दोघांनी अनुक्रमे १० आणि ३१ धावा करून विकेट गमावली. रुट खेळपट्टीवर सेट होतच होता, पण तितक्यात मोहम्मद सिराजने त्याला तंबूचा रस्तात दाखवला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा जॅक लीज मोहम्मद शामीच्या चेंडूवर एकही धाव न करता बाद झाला.
जसप्रीत बुमराहने दुसऱ्या दिवशी, तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. यामध्ये लीस, क्रोली आणि पोप या वरच्या फळीतील तिन्ही फलंदाजांचा समावेश होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ENG vs IND | रिषभ पंतचा ‘तो’ चौकार ज्यामुळे पडला जेम्स अँडरसनचा चेहरा
रिषभ पंतच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे वादग्रस्त ट्वीट, पाहा चाहते का भडकले
सिराजच्या जादूई चेंडूने मुळापासून उखडला ‘रूट’, बघा कसा बाद झाला इंग्लंडचा हुकमी एक्का!