पुणे| पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए एआयटीए 18वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात पियुष जाधव, अभिराम निलाखे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या तिसऱ्या चरणात प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, शिवछत्रपती म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत दुसऱ्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात पियुश जाधव याने दुसऱ्या मानांकित अनिकेत चोभेचा 9-2 असा तर, अभिराम निलाखेने पाचव्या मानांकित मीर वेरेकरचा 9-3 पराभव करून आगेकूच केली. सिद्धार्थ मराठे व आर्यन हूड यांनी अनुक्रमे अर्णव बनसोडे व यशराज जेरवाल यांचा 9-1 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. आनंद विहारीने आर्यन पटेलला 9-4 असे पराभूत केले. सन्मय तेलंगने साईराज श्रोत्रीवर 9-7 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी पात्रता फेरी: मुले:
पियुष जाधव वि.वि.अनिकेत चोभे[2] 9-2;
अभिराम निलाखे वि.वि.मीर वेरेकर[5] 9-3;
सक्षम चव्हाण वि.वि.संकल्प पवार 9-5;
करण भामरे वि.वि.अर्णव चावला 9-0;
अर्चित डहाळे[6]वि.वि.ऋषिकेश चितळे 9-3;
ओम पाटील वि.वि.वेदांत माणकेश्वर 9-1;
सन्मय तेलंग वि.वि.साईराज श्रोत्री 9-7;
आर्यन हूड वि.वि.यशराज जेरवाल 9-1;
सिद्धार्थ मराठे वि.वि.अर्णव बनसोडे 9-1;
आनंद विहारी वि.वि.आर्यन पटेल 9-4;
महत्त्वाच्या बातम्या –
कोण आहे ‘ज्युनियर मलिंगा’ मथीशा पथिराना, ज्याने सीएसकेकडून केले दिमाखात आयपीएल पदार्पण
Video: ओव्हरस्मार्ट बनायला निघालेल्या जोस बटलरची फजिती, आवेश खानने केले क्लिन बोल्ड
राजस्थानने लखनऊचा उडवला धुव्वा, २४ धावांनी सामना जिंकत प्लेऑफसाठीचा दावा केला मजबूत