आयपीएल 2023 चा लिलाव पार पडल्यानंतर आता सर्व संघांनी आगामी हंगामाची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने या आगामी हंगामासाठी आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज म्हटल्या जाणाऱ्या जगदीश अरुण कुमार यांची नियुक्ती केली. संघाचे सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षक म्हणून ते जबाबदारी सांभाळताना दिसतील.
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले. मात्र मागील दोन हंगामापासून त्यांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच यावेळी संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अरुण कुमार हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे नाव आहेत. त्यांनी तब्बल पंधरा वर्षे कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्यांनी शंभर पेक्षा अधिक प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. तसेच प्रशिक्षकाची भूमिका देखील त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली आहे.
Presenting 𝐀𝐫𝐮𝐧 𝐉𝐚𝐠𝐚𝐝𝐞𝐞𝐬𝐡 आपले नवीन assistant batting coach! 😍
Arun has previously won consecutive titles in 2013-14 & 2014-15 as Karnataka’s batting coach in Ranji Trophy, Irani Trophy and Vijay Hazare Trophy.🏆
Welcome to #OneFamliy 💙#DilKholKe #MumbaiIndians pic.twitter.com/YjTOGsQ8yz
— Mumbai Indians (@mipaltan) December 28, 2022
अरुण कुमार हे फलंदाजी प्रशिक्षक असताना कर्नाटकने रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफी व विजय हजारे ट्रॉफी आपल्या नावे केली होती. यासोबतच त्यांनी पॉंडेचेरी संघासाठी देखील प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते अमेरिकेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई इंडियन्स संघात प्रशिक्षकांची व मार्गदर्शकांची एक मोठी फळी दिसून येते. सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर हा संघाचा मुख्य मार्गदर्शक आहे. तर, श्रीलंकेचा दिग्गज माहेला जयवर्धने हा ग्लोबल हेड म्हणून काम पाहतो. यावर्षी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू मार्क बाऊचर मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत असेल. तर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायरन पोलार्ड पहिल्यांदाच जबाबदारी सांभाळेल. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून न्यूझीलंडचा दिग्गज शेन बॉंड हा मागील काही वर्षांपासून संघाचा भाग आहे.
(Jagadeesh Arun Kumar Appointed As Mumbai Indians New Assistant Batting Coach)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतच्या अपघाताविषयी बीसीसीआयची मोठी अपडेट, बोर्ड कुटुंबियांच्या सतत संपर्कात
आयपीएलच्या इतिहासात ‘या’ खेळाडूला मिळाली सर्वाधिक सॅलरी, धोनी दुसऱ्या स्थानावर