पुणे,दि.9 नोव्हेंबर 2023: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या तेराव्या ओम दळवी मेमोरियल डॉ.नितु मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात जय पवार, अनमोल नागपुरे यांनी तर, मुलींच्या गटात स्वानिका रॉय, ध्रुवी आद्यंतया यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित जय पवारने अव्वल मानांकित पार्थ देवरुखकरचा 6-2, 6-4 असा पराभव करून खळबळजनक निकाल नोंदवला. तर दुसऱ्या सामन्यात चौथ्या मानांकित अनमोल नागपुरेने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या आश्विन नरसिंघानीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत स्वानिका रॉयने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत आठव्या मानांकित आनंदी भुतडाचा टायब्रेकमध्ये 7-6(6), 6-2 असा पराभव केला. पुण्याच्या ध्रुवी आद्यंतयाने आपली शहर सहकारी श्रेया पठारेचा 6-1, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरीत उपांत्य फेरीत सार्थ बनसोडे व अर्णव बनसोडे यांनी जय पवार व पार्थ देवरुखकर या अव्वल मानांकित जोडीचा 6-4, 6-4 असा तर, ओंकार शिंदेने अश्विन नरसिंघानीच्या साथीत नीव कोठारी व सुहास सोमा यांचा 6-2, 3-6, 10-4 असा सुपरटायब्रेकमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली. (Jai Pawar, Anmol Nagpure, Swanika Roy, Dhruvi Adityana enter the finals of All India Ranking Super Series Tennis Tournament)
निकाल: उपांत्य फेरी: मुले:
जय पवार(महा)(3)वि.वि.पार्थ देवरुखकर(महा)(1)6-2, 6-4;
अनमोल नागपुरे(महा)(4)वि.वि.आश्विन नरसिंघानी (महा) 6-3, 6-2;
मुली:
स्वानिका रॉय (महा) वि.वि.आनंदी भुतडा(महा)(8) 7-6(6), 6-2;
ध्रुवी आद्यंतया (महा) वि.वि.श्रेया पठारे(महा)6-1, 7-5;
दुहेरी: मुले: उपांत्य फेरी:
सार्थ बनसोडे/अर्णव बनसोडे वि.वि.जय पवार/पार्थ देवरुखकर(1) 6-4, 6-4;
ओंकार शिंदे/अश्विन नरसिंघानी (4)वि.वि.नीव कोठारी/सुहास सोमा 6-2, 3-6, 10-4.
महत्वाच्या बातम्या –
CWC 2023 । भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल होणार? पाहा काय आहेत समीकरणं
सचिनच्याही पुढे रचिन! पहिल्याच वर्ल्डकपमध्ये अनेक दिग्गजांचे विक्रम केले उद्ध्वस्त