भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांची आयसीसीच्या (ICC) अध्यक्षपदी निवड झाली आहे. आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह (Jay Shah) सर्वात तरुण भारतीय आहेत. जय शाह वयाच्या 36व्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. जय शाहपूर्वी भारतातील इतर दिग्गजांनी हे पद सांभाळले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जय शहा (Jay Shah) यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आता (1 डिसेंबरला) जय शाह पद स्वीकारतील.
जय शाह (Jay Shah) यांच्या आधी 4 भारतीय आयसीसीचे अध्यक्ष होते. जगमोहन दालमिया 1997 ते 2000 पर्यंत आयसीसीचे अध्यक्ष होते. त्यानंतर 2010 ते 2012 पर्यंत शरद पवार अध्यक्ष होते, तर एन श्रीनिवासन 2014-15 मध्ये अध्यक्ष होते. शशांक मनोहर 2015-2020 पर्यंत अध्यक्ष होते. आता डिसेंबर 2024 पासून जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना दिसणार आहेत.
आयसीसीचे प्रमुख (भारतीय)
जगमोहन दालमिया- (1997-2000)
शरद पवार- (2010-2012)
एन श्रीनिवासन- (2014-2015)
शशांक मनोहर- 2015-2017, 2018-2020)
जय शहा- (2024- पुढे)
महत्त्वाच्या बातम्या-
“बुमराहकडे पाहा…” पराभवानंतर माजी खेळाडू पाकिस्तानी गोलंदाजांवर भडकला
IPL 2025: केएल राहुलला मिळणार का संघात स्थान? लखनऊ घेणार पत्रकार परिषद
आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड…!