---Advertisement---

या स्टेडियमवर होणार महिला आयपीएलचे सामने; नवीन संघाचीही झाली घोषणा

On: शनिवार, फेब्रुवारी 29, 2020 6:44 PM
---Advertisement---

मागील दोन वर्षापासून इंडियन प्रीमीयर लीग दरम्यान महिलांचेही टी20 सामने खेळवण्यात येतात. या सामन्यांचे यश पाहुन यावर्षीही आयपीएलमध्ये महिलांच्या 7 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

या महिला ट्वेंटी20 चॅलेंज मालिकेत यावर्षी चार संघ सहभागी होणार आहेत. मागीलवर्षी सुपरनोवा, ट्रेलब्लेझर्स आणि वेलोसिटी या तीन संघात 4 सामन्यांची ही मालिका खेळवण्यात आली होती. पण यावर्षी नवीन संघही या मालिकेत सहभागी होणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यासह 7 सामने होणार आहेत.

महिलांचे हे सामने आयपीएलच्या प्लेऑफच्या सामन्यांदरम्यान खेळवण्यात येणार आहेत. तसेच हे सर्व सामने जयपूरमध्ये सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहेत. मात्र अजून बीसीसीआयने या सामन्यांच्या तारखा आणि वेळ घोषित केलेला नाही त्याचबरोबर नवीन संघाचे नावही घोषित करण्यात आलेले नाही.

तसेच बीसीसीआयने माहिती दिली आहे की मागील 2 वर्षाप्रमाणे यावर्षीही भारतीय महिला संघातील सध्याचे आणि भविष्यातील स्टार खेळाडू जगातील सर्वोत्तम खेळाडूंबरोबर खेळताना दिसतील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---