दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियममध्ये (जुने नाव फिरोज शहा कोटला स्टेडियम) माजी केंद्रीय मंत्री व दिल्ली क्रिकेट बोर्डचे माजी अध्यक्ष अरुण जेटली यांचा पुतळा उभारला जाणार आहे. जेटली हे जवळ जवळ पंधरा वर्ष दिल्ली क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते. 28 डिसेंबर रोजी जेटलींची 68 जयंती आहे व याप्रसंगी प्रतिमेचे अनावरण केले जाऊ शकते.
जेटलींच्या प्रतिमेसाठी पितळाचा वापर केला गेला असून, १५ ते २० लाख रुपये खर्च आलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रतिमेचे अनावरण केले जाऊ शकते. याप्रसंगी दिल्ली अँड डिस्ट्रीक्ट क्रिकेट बोर्डाचे (डीडीसीए) पदाधिकारी, अरुण जेटली यांचे सुपुत्र आणि सध्याचे डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी ,अनुराग ठाकूर ,बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सेक्रेटरी जय शहा व माजी दिग्गज भारतीय खेळाडू गौतम गंभीर व विरेंद्र सेहवाग उपस्थित राहणार आहेत.
मात्र या संदर्भात वाद सुरू झाला असून दिल्ली क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी पुतळा उभारण्याला विरोध केला आहे.
बिशनसिंग बेदी यांच्या मते एखाद्या खेळाडूचा पुतळा उभारणे जास्त उपयुक्त ठरेल. तसेच बेदी यांनी हा विरोध करताना काही दिवसांपूर्वी या स्टेडियमच्या एका स्टँडला असलेले त्यांचे नाव काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यामुळे दिल्ली क्रिकेटमध्ये सध्या नवीन वाद सुरू झाला आहे.
जेटली यांचा पुतळा स्टेडियममधील विरेंद्र सहवाग गेट ( गेट नंबर १ ) येथे उभारला जाणार आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात फिरोजशहा कोटला स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम असे ठेवण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘अरुण जेटली स्टेडियमच्या स्टँडवरील माझे नाव तात्काळ हटवण्यात यावे’, बिशनसिंग बेदींची धक्कादायक मागणी
दशकातील सर्वोत्तम आयसीसी महिला वनडे आणि टी२० संघ जाहीर, मितालीसह ‘या’ भारतीयांना मिळाले स्थान
भारत वि. ऑस्ट्रेलियाचा तिसरा कसोटी सामना सिडनीऐवजी मेलबर्नमध्ये? येत्या दोन दिवसात होणार निर्णय