---Advertisement---

जांभळी राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत आज अंतिम थरार

On: गुरूवार, फेब्रुवारी 6, 2020 3:49 PM
---Advertisement---

जांभळी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय व्यावसायिक निमंत्रीत पुरुष कबड्डी स्पर्धेत आज अंतिम थरार रंगणार आहे. स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती चषक कबड्डी स्पर्धेत मुंबई बंदर, इनकम टॅक्स, महिंद्रा अँड महिंद्रा व आयएसपील युवा पलटण संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुंबई बंदर विरुद्ध सेंट्रल बँक यांच्यात पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. मध्यांतरापर्यत २२-१६ अशी आघाडी सेंट्रल बँककडे होती. नंतर मात्र मुंबई बंदरने आक्रमक खेळ करत सामना फिरवला. मुंबई बंदर कडून स्मितील पाटिलने चढाईत जबरदस्त खेळ केला. त्याला मनोज बोन्द्रे, शुभम कुंभार यांची चांगली साथ मिळाली.

इनकम टॅक्स विरुद्ध भारत पेट्रोलियम यांच्यात झालेल्या सामन्यांत इनकम टॅक्स संघाने ५-५ चढाईत ३६-३४ (७/५) अशी बाजी मारली. निलेश साळुंखेची ३ गुणांची चढाई निर्णायक ठरली. तुषार चव्हाण, कृष्णा मदने यांनी उत्कृष्ट खेळ केला. अंत्यत चुरशीचा झालेला हा सामना निर्धारित वेळेत २९-२९ असा बरोबरीत सुटला होता. भारत पेट्रोलियम कडून निलेश शिंदे, आकाश यांनी चांगला खेळ केला.

महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध महाराज पोलीस यांच्यात झालेल्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत महिंद्रा अँड महिंद्रा संघाने २७-२६ अशी बाजी मारली. मध्यांतराला ९-१८ असा पिछाडी वरून सुलतान डांगे, महेंद्र राजपूत या महाराष्ट्र पोलीस कडून चांगला खेळ करत सामन्यांत रंगत आणली. अजिंक्य पवार, ओमकार जाधव, स्वप्नील शिंदे यांनी महिंद्रा कडून चांगला खेळ केला.

एयर इंडिया विरुद्ध आयएसपील युवा पलटण यांच्यात झालेल्या चौथ्या उपउपांत्य सामन्यांत युवा पलटण संघाने ३४-१५ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. युवा पलटण कडून असलम इनामदार, पंकज मोहिते, अदित्य शिंदे, शुभम शिंदे यांनी उत्कृष्ट खेळ केला.

आज अंतिम दिवशी कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक श्री. सुहास वारके हे प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती मंडळाचे साचिव श्री.प्रदीप बनगे यांनी दिली. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जांभळी क्रीडा मंडळ, जांभळीचे आजीव अध्यक्ष गणपतराव पाटिल दादा, सचिव प्रदीप बनगे, विलास माने, भाऊसाहेब पाटील, अनिल राऊत, सोपान कदम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---