हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला आहे. यासह मालिका १-१ च्या बरोबरीत आणली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा दुसरा डाव अवघ्या २७८ धावांवर संपुष्टात आला. तर इंग्लंड संघाकडून गोलंदाजी करताना जेम्स अँडरसनने या सामन्यात ४ गडी बाद केले. यासह त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर करत दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे.
दुसऱ्या डावात जेम्स अँडरसनने भारताचा उपकर्णधार अजिंक्य राहणेला बाद करत माघारी धाडले होते. राहणेला बाद करताच तो कसोटी क्रिकेटमध्ये मायदेशात ४०० विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.
जेम्स अँडरसनने या सामन्यातील पहिल्या डावात केएल राहुल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या फलंदाजांना बाद केले होते. तर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेला बाद करताच त्याच्या नावे मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याच्या विक्रमाची नोंद झाली आहे. असा कारनामा करणारा तो दुसराच गोलंदाज ठरला आहे.
या यादीत सर्वोच्च स्थानी मुथय्या मुरलीधरन आहे. त्याने मायदेशात म्हणजेच श्रीलंकेत ४९३ गडी बाद केले आहेत. तर या यादीत तिसऱ्या स्थानी अनिल कुंबळे आहे, त्यांनी भारतात ३५० गडी बाद केले होते. (James Anderson became second Bowler after muttaih Muralitharan to take most wickets at home)
या सामन्यातील पहिल्या डावात भारताचा डाव केवळ ७८ संपुष्टात आला होता. त्यानंतर इंग्लंड संघाने ४३२ धावा करत ३५४ धावांची आघाडी घेतली होती. या डावात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने मालिकेतील तिसरे शतक झळकावले होते.
ही पिछाडी भरुन काढताना भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अप्रतिम फलंदाजी केली. परंतु, चौथ्या दिवशी भारतीय संघाला चांगली कामगिरी कायम सुरू ठेवता आली नाही. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या २७८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
मायदेशात सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज
४९३ गडी – मुथय्या मुरलीधरन
४०० गडी – जेम्स अँडरसन
३५० गडी – अनिल कुंबळे
३४१ गडी – स्टुअर्ट ब्रॉड
३१९ गडी – शेन वॉर्न
महत्त्वाच्या बातम्या –
रसेलने पाकिस्तानी गोलंदाजाला अक्षरश: रडवलं, एका षटकात ४ सिक्ससह चोपल्या ३२ धावा
आरारा खतरनाक! इंग्लंडच्या क्रिकेटरने पुढे सरसावत एका हाताने ठोकला गगनचुंबी षटकार