यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (१० जून) एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मैदानावर उतरताच इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने आपल्या देशासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला.
अँडरसनचा विक्रमी सामना
लॉर्डस येथे झालेला पहिला कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना एजबॅस्टन येथे सुरु झाला. इंग्लंड या सामन्यात एक बदल केला. तर, न्यूझीलंडला दुखापतीमुळे एकावेळी चार बदल करावे लागले.
इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने या सामन्यात खेळताना इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. त्याच्या नावे आता १६२ कसोटी सामने जमा झाले आहेत. त्याने इंग्लंडचा दिग्गज फलंदाज ऍलिस्टर कूक याला मागे टाकले. कूकने १६१ कसोटीमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आगे.
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी अँडरसनचा सहकारी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड असून, त्याच्या नावे आत्तापर्यंत १४८ कसोटी सामने जमा आहेत. या यादीमध्ये चौथ्या आणि पाचव्या स्थानी अनुक्रमे ऍलेक स्टीवर्ट व इयान बेल यांचा क्रमांक लागतो. या दोघांनी अनुक्रमे १३३ व ११८ कसोटी सामने खेळले आहेत.
https://twitter.com/ICC/status/1402924013022760960
अशी आहे अँडरसनची कारकीर्द
जेम्स अँडरसनने २००३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रारंभ केला होता. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या १६२ कसोटींमध्ये ६१६ बळी मिळवले आहेत. अँडरसनने २०१५ मध्ये वनडे व टी२० क्रिकेट खेळणे सोडले आहे. यामध्ये तो १९४ वनडे तर, १९ टी२० सामने खेळला असून, त्याच्या नावे २६९ व १८ बळी जमा आहेत. अँडरसन कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज मानला जातो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘विश्वचषक २०११च्या सेमी फायनलमध्ये मी असतो, तर भारतीय फलंदाजांची हाडे खिळखिळी केली असती’
…आणि ‘त्या’ दिवशी विराटने सामनाही जिंकला व करोडो भारतीयांची मनंही, पाहा व्हिडीओ





