ओव्हलच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान भारतीय संघातील मुख्य फलंदाज या डावात देखील फ्लॉप ठरले आहेत. चेतेश्वर पुजाराला देखील जेम्स अँडरसनने अवघ्या ४ धावांवर माघारी धाडले होते. पुजाराला बाद करताच जेम्स अँडरसनने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
चेतेश्वर पुजारा गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने लीड्स कसोटीत ९१ धावांची खेळी केली होती. परंतु, ओव्हल कसोटीत तो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. ओव्हल कसोटी सामन्यातील पहिल्या डावात जेम्स अँडरसनने त्याला जॉनी बेअरस्टोच्या हातून झेलबाद करत अवघ्या ४ धावांवर माघारी धाडले होते.
जेम्स अँडरसनने चेतेश्वर पुजाराला आतापर्यंत एकूण ११ वेळेस बाद केले आहे. चेतेश्वर पुजारा हा जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर सर्वाधिक वेळेस बाद होणारा दुसरा फलंदाज आहे. तर पहिल्या स्थानी सचिन तेंडुलकर आहे.
जेम्स अँडरसन आणि भारतीय फलंदाज यांचे जुने नाते आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांच्यातील स्पर्धा पाहण्यासारखी होती. जेम्स अँडरसनने सचिनला सर्वाधिक १२ वेळेस बाद केले आहे. तर, चेतेश्वर पुजाराला जेम्स अँडरसनने ११ वेळेस बाद केले आहे. तसेच जेम्स अँडरसनने विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि एमएस धोनीला १० वेळेस पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.
जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर सर्वाधिक वेळेस बाद होणारे भारतीय फलंदाज
१२- सचिन तेंडुलकर
११- चेतेश्वर पुजारा*
१०- अजिंक्य रहाणे
१०- विराट कोहली
१० एमएस धोनी
पुजाराला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज
अँडरसन हा पुजाराला कसोटीत सर्वाधिकवेळा बाद करणाराही गोलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनला मागे टाकले आहे. नॅथन लायनने पुजाराला १० वेळा कसोटीत बाद केले आहे. तर पॅट कमिन्सने ६ वेळा आणि जोश हेजलवूडने ५ वेळा पुजाराला बाद केले आहे.
भारताचे प्रमुखे फलंदाज फ्लॉप
या सामन्यात कर्णधार रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय संघाला १९१ धावांवर रोखले. सलामीवीर केएल राहुल १७ धावा करत माघारी परतला, तर रोहित शर्मा अवघ्या ११ धावा करत माघारी परतला होता. तसेच अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे देखील फ्लॉप ठरले आहेत. रहाणे १४ धावा करत परतला तर चेतेश्वर पुजाराला अवघ्या ४ धावा करता आल्या.
तसेच विराट कोहलीला या डावात चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु त्याला देखील मोठी खेळी करता आली नाही. तो ५० धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर शार्दुल ठाकूरने ताबडतोड फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. त्याने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावा केल्या. त्यामुळे भारताला १९१ धावा करता आल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर ऑली रॉबिन्सनने ३ विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
तालिबान्यांना अफगाणिस्तान अन् भारतीय संघामध्ये खेळवायची आहे मालिका, पण बीसीसीआयचं म्हणणं काय?
क्वारंटाईनमध्ये राहून वसीम अकरमची पडली टक्कल; बघून तोंडून निघेल, ‘ये क्या हुआ? कैसे हुआ?’
क्रिस वोक्स इज बॅक! रोहित शर्माची ११ धावांवर विकेट घेत वर्षभरानंतर केले दमदार पुनरागमन, पाहा व्हिडिओ