क्रिकेटविश्वात काळानुसार अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. जगभरातील क्रिकेटपटू सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. त्यामधील काही क्रिकेटपटू ट्विटर आणि इंस्टाग्रामवर खूपच ऍक्टीव्ह आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर अग्रेसर आहे. तो इंस्टाग्रामवरच्या रील्समुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र क्रिकेटविश्वात आता इंग्लंडच्या जेम्स अँडरसनच्या एका पोस्टची चर्चा चांगलीच रंगली आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याचा एक टिक टॉक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने ट्विटरवर कोणत्या शब्दांना म्यूट ठेवले आहे हे सांगितले आहे. त्यानेे स्वत या व्हिडिओमध्ये रिषभ पंत (Rishabh Pant) आणि ग्लेन मॅकग्रा (Glenn MacGrath) या शब्दांना म्यूट केले आहे, हे सांगितले आहे. याबरोबरच त्याने स्वीप आणि रिव्हर्स स्वीप सारख्या शब्दांनाही म्यूट केले आहे.
यामागची गंमत अशी की, तुम्ही ट्विटरवर काही शब्द म्यूट केले तर तुमच्या टाईमलाईनवर त्या शब्दांशी निगडीत कमी पोस्ट/ फीड दिसतात. आता अँडरसनने ज्या शब्दांना म्यूट केले आहेत, त्यावरून त्याच्या टाईमलाईनवर पंतशी निगडीत ट्वीट्स दिसणार नाहीत.
पंत, अँडरसन आणि रिव्हर्स स्वीपचे खास कनेक्शन
अँडरसन हा एक दिग्गज गोलंदाज आहे. नुकतेच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिल्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने अनेक महान फलंदाजांना त्रास दिला आहे, मात्र भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज पंत हा त्या गटात मोडत नाही. त्याने उलट अँडरसनला अधिक त्रास दिला आहे.
अँडरसनच्या गोलंदाजीवर एकीकडे फलंदाज एका रेषेत खेळण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे पंतने त्याला रीवर्स स्वीप शॉट मारत चेंडू सीमारेषेपार फटकारले आहेत. हेच अँडरसनच्या पंत आणि रिव्हर्स स्वीप शब्द म्यूट करण्याच्या मागचे कारण आहे.
Muted words of James Anderson on Twitter include Pant, Mcgrath, Clouds and more. pic.twitter.com/gXdu5a9Ouk
— Johns. (@CricCrazyJohns) September 1, 2022
पंत आणि अँडरसन हे दोघे 2018 पासून ते आतापर्यंत तीन मालिकेत समोरासमोर आले आहेत. तर 196 चेंडूंचा सामना करताना पंत तीनवेळा अँडरसनचा शिकार झाला आहे. तसेच पंतने अँडरसनच्या विरुद्ध 98 धावा केल्या असून त्यामध्ये 16 चौकारांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतावर प्रेम करणारा वॉर्नर नाही खेळणार भारताविरुद्ध! हे आहे कारण
अल्टीमेट खो खो लीगच्या पहिल्या मौसमसाठी एकूण 2कोटी पारितोषिक रक्कम जाहीर; प्ले ऑफ सामन्यांना शुक्रवारी प्रारंभ
पुन्हा एकदा सचिन करणार टीम इंडियाचे नेतृत्व! ‘या’ स्पर्धेतून करतोय कमबॅक